लिटल एंजल्स दत्तगुरु इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे शानदार उद्घाटन

लिटल एंजल्स दत्तगुरु इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे शानदार उद्घाटन

उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर शहरातील लोकप्रिय असलेल्या लिटल एंजल्स दत्तगुरु इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी गृह राज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंदअण्णा केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते बालाजी परगे रेड्डी, प्रा. शाम डावळे, संस्थेच्या सचिव आशा ममदापूरे, संस्थेचे विश्वस्त सिद्धेश्वर ममदापूरे, मुख्याध्यापक सचिन पाटील, मुख्याध्यापक माधव भांगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख अक्रम पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी लिटल एंजल्स दत्तगुरु इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनांतर्गत नृत्य, अभिनय, मूक अभिनय, पोवाडा, गोंधळ, समूह नृत्य अशा विविध कला प्रकारांचे प्रदर्शन करत सांस्कृतिक प्रगतीचे दर्शन घडवून आणले. विद्यार्थ्यांनी मनमोहक अशा पद्धतीचे विविध कला गुणदर्शन दाखवल्याबद्दल प्रमुख अतिथींनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून शाळेच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन विकास पुरुष उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिरगोंडा देवर्षे, मोमीन सद्दाम, अनिता सुवर्णकार, राजेश्वरी पारसेवार, संगीता पोपलाई, प्रीती शेटकार, दिपाली होनराव, सारिका पेचफुले, कविता क्षीरसागर, श्रीदेवी रायपल्ले, कविता तोंडारे, दीक्षालिणी शिंदे, तिरूमला गायकवाड, प्रशांत भांगे, रेश्मा कुरेशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र चनाळे यांनी केले. संस्था सचिव आशा ममदापूरे यांनी प्रस्ताविकातून शाळेच्या विकासाचा आलेख उपस्थित प्रमुख मान्यवर आणि पालक यांच्या समोर मांडला. शाळा सतत प्रगतीपथावर असून उदगीरच्या शैक्षणिक प्रगती मध्ये सिंहाचा वाटा उचलत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

About The Author