प्रांत ग्राहक संरक्षण च्या मराठवाडा अध्यक्ष पदि अभिजीत औटे यांची निवड

प्रांत ग्राहक संरक्षण च्या मराठवाडा अध्यक्ष पदि अभिजीत औटे यांची निवड

उदगीर(एल.पी.उगीले) : तुळजापूर येथील प्रांत ग्राहक संरक्षण परिषद बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांनी अभिजीत औटे यांना नियुक्तीपत्र देऊन निवड केली. या वेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष विशाल  रोचकरी, आशा पाटील, शेफाली शर्मा, निपुण शेंडगे, राजेंद्र लहाने, तुकाराम चव्हाण, सतिश बंडकर, बालाजी फावडे, धनंजय कोळी, राहुल घोडके, शिवाजी बंडगर, रतिकांत घोगरे, विनोद पदमगीरवार आदी मित्र परिवार उपस्थितीत होता. या निवडी च्या माध्यमातून आपण प्रत्येक जिल्ह्य़ात व तालुक्यातील प्रत्येक गावा गावात जाऊ ग्राहक जनजागृतीपर मेळवे घेऊ, ग्राहकांची कशी फसवणूक होते? याचे मार्गदर्शन करुन ग्राहकामध्ये जागरुक करनार, असे मत नव नियुक्त विभागीय अध्यक्ष अभिजीत औटे यांनी व्यक्‍त केले.

जन माणसाच्या संदर्भात सतत प्रयत्नशील असलेले नेते म्हणून ते ओळखले जात असल्याने निश्चित या भागात ते उत्कृष्ट कार्य करून आपला वेगळा ठसा उमटवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

About The Author

error: Content is protected !!