शिवजन्मोत्सवानिमित्त शेल्हाळ येथे नेत्ररोग निदान शिबीर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून उदगीर तालुक्यातील शेल्हाळ येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला दत्तात्रय पाटील यांच्या पुढाकारातून नेत्ररोग तपासणी शिबीर घेण्यात आले.या शिबीरात जवळपास २५० जणांची तपासणी करण्यात आली, तर जवळपास ३५ ते ४० जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सिध्देश्वर पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस उषा कांबळे, जिल्हाध्यक्षा सूर्यशीला मोरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सरोजा बिरादार, माजी नगरसेविका बबिता भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्ष डॉ. भाग्यश्री घाळे, जिजाउ ब्रिगेडच्या शिल्पा इंगळे, सरपंच विमलबाई चिखले, चेअरमन किशनराव मोरे, मुख्याध्यापिका अंजली स्वामी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी सर्व पाहूण्यांचे स्वागत दत्ता पाटील शेल्हाळकर व चारूशीला पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम मोरे, पुंडलीक मोरे, लक्ष्मण महाराज, शरद मोरे, विजय पाटील, मारोती सावळे, सुनील नरवटे, चंद्रकांत जाधव यांनी कार्यकमासाठी पुढाकार घेतला.