श्री महादेव विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

श्री महादेव विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील धनेगाव येथील श्री महादेव विद्यालयात इयत्ता दहावी वर्गाचा स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.स्वयंशासन दिनी पायल साळुंखे हिने मुख्याध्यापक म्हणून शालेय कामकाज आणि एक दिवशीय प्रशासन चालवले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रामलिंग मुळे हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका पायल साळुंखे, उपमुख्याध्यापिका श्रुती बिरादार, पर्यवेक्षक श्रीपती सावंत, पर्यवेक्षक बंडगर सी.एस., मुसळे बी. एस., धडे आर. एस., मोमले एम. पी., शहापुरे डी.आर. इत्यादी उपस्थित होते.याप्रसंगी प्राचार्य रामलींग मुळे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, यशस्वी जीवनाची पायाभरणी ही शालेय शिक्षणातूनच होते. नंतरच्या काळात उच्च शिक्षण घेतानाच निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच पुढील वाटचाल केली पाहिजे. विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून भविष्याला आकार देणारा, रुची, कला दर्शवणारे एक प्रतीक असते. मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते.

या विद्यार्थ्यांना मुसळे बी. एस., धडे आर. एस., शहापुरे डी.आर. यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रथमच शिक्षक म्हणून भूमिका पार पाडताना जबाबदारीने संपूर्ण दिवस शाळा सांभाळली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपती सावंत यांनी केले तर आभार श्रुती बिरादार हिने मानले.

About The Author