अवैध दारूसह पकडला जुगार अन् मटका !!
वाढवणा पोलिसांचा भल्या भल्यांना झटका!!
उदगीर (एल. पी. उगीले) : पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून काम करायचे ठरवले, आणि अवैध धंदे बंद करून सर्वसामान्य नागरिकांना गोरगरिबांना न्याय देण्याचा संकल्प केला. तर निश्चितपणे समाजामध्ये एक आदर्श यंत्रणा म्हणून पोलीस प्रशासनाकडे पाहिले जाऊ शकते. उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध धंदे हद्दपार करण्याचा जणू दृढ निश्चय केला आहे की काय? असे वाटन्या इतपत अंग झटकून काम करायला सुरुवात केली आहे. अवैध धंद्याच्या विरोधात वाढवणा पोलिसांनी घेतलेली भूमिका निश्चितच उल्लेखनीय आहे. मग ती अवैध मटका, गुटखा, जुगार याच्या विरोधात असेल किंवा वाळू माफिया च्या विरुद्ध अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून घेतलेली खबरदारी असेल! ही कामगिरी उल्लेखनीय आहे.
दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी हंडरगुळी परिसरात फिरोज हक्कानी तांबोळी वय 34 वर्ष रा. हंडरगुळी ता. उदगीर आणि अमन आयुब पठाण रा. हळी ता. उदगीर हे दोघे आपल्या फायद्यासाठी मिलन डे नावाचा मटका जुगार बेकायदेशीर पणे आकड्यावर पैसे लावून स्वतःच्या व मालकाच्या फायद्यासाठी खेळत व खेळवीत असताना, वाढवणा पोलिसांनी धाड टाकून मिलन डे जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम 810 रुपये मुद्देमाला सह जप्त केली आहे.
याप्रकरणी मुरारी किसन गायकवाड यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींच्या विरुद्ध वाढवणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 24/ 23 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, रीतसर कारवाई केली आहे. अशा कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला काही प्रमाणात का होत नाही, आळा बसेल अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
ग्रामीण भागातील जनता विशेष करून शारीरिक कष्ट करणारे मजूर वगैरे दिवसभर केलेल्या कष्टाचा सीन जावा, म्हणून श्रमपरिहारासाठी नशा पान करतात. मात्र मिळकत कमी आणि खर्च जास्त! हे सूत्र त्यांना जमत नसल्याने मग ते लोक कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त नशा कशी होईल? याचा विचार करायला लागतात. तळीरामाची ही अडचण लक्षात घेऊन वाडी, तांड्यावर हातभट्टीची अड्डे बनवून गावठी हातभट्टी दारू बनवून त्या लोकांना विक्री केली जाते. कित्येक वेळा अशी गावठी हातभट्टीची दारू नवसागराच्या जास्त प्रमाणामुळे तळीरामाच्या जीवावरही बेतते, मात्र अशी हालत का झाली? हे त्यांना समजत नाही. परिणामतः गोरगरीब लोक नशेसाठी हातभट्टीच्या दारूचा आधार घेत असतात, तळीरामाची ही कमजोरी विचारात घेऊन हातभट्टीची दारू बनवण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढलेले आहे. अशा दारूमुळे कित्येकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून वाढवणा पोलिसांनी अवैध आणि बेकायदेशीर रित्या, विना पास परवाना गावठी हातभट्टीची दारू बनवणे, विक्री करणे, बाळगणे यावर प्रतिबंध आणण्यासाठी धाडी टाकायला सुरुवात केली आहे.
वाढवणा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या डोंगरशेळकी तांडा येथील आरोपी निळूबाई रामदास पवार यांच्याजवळ हातभट्टीची बारा लिटर दारू वाढवणा पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पोलीस हवालदार माणिक संतराम कसबे यांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरुद्ध गु.र.नंबर 25/ 23 कलम 65 (अ)( इ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कारवाई केली आहे. तसेच आरोपीकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
याचप्रमाणे वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुमठाणा येथे मिलिंद राजेंद्र किवंडे हे स्वतःच्या फायद्यासाठी शहरातून देशी दारू आणून, विनापरवाना विक्री करण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती हाती येताच वाढवना पोलिसांनी धाड टाकून आरोपी जवळ देशी दारू, भिंगरी संत्रा कंपनीचे कागदी लेवल असलेल्या 180 एम एल च्या 13 बॉटल, प्रति बॉटल 70 रुपये प्रमाणे एकूण 910 रुपये मुद्देमाल बेकायदेशीर व्यवसाय करण्याच्या उद्देशाने बाळगला म्हणून आरोपीच्या विरुद्ध पोलीस हवालदार शिवाजी ज्ञानोबा सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस स्टेशन येथे आरोपी मिलिंद राजेंद्र किवंडे यांच्याविरुद्ध गु.र.न. 26 /23 कलम 65 (अ) (इ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढवणा गावात देखील देशी दारूची चोरटी विक्री व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या. त्यामुळे वाढवणा पोलिसांनी अशा पद्धतीने चोरून अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित केले होते. तेव्हा वाढवना गावातील साळवे नगर परिसरात राहणारी रंजना प्रकाश सूर्यवंशी ही महिला अवैधरित्या देशी दारू बाळगून, विक्री करते, असे समजल्याने वाढवणा पोलिसांनी धाड टाकली असता, आरोपीजवळ देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीचे असे लेबल असलेल्या काचेच्या 180 एम एल च्या बारा बॉटल प्रति बॉटल सत्तर रुपये प्रमाणे किंमत 840 रुपयेचा माल आढळून आला. त्यामुळे पोलीस नायक संजय शिवाजी कलकत्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 27 /23 कलम 65 (अ)( इ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अशाच पद्धतीने वाढवणा गावातील मजुरी करणारा व्यक्ती माणिक सखाराम गंडरे हा असाच पद्धतीने अवैध दारू विक्री करत असल्याचा संशय आल्यावर वाढवणा पोलिसांनी पाळत ठेवली असता, वाढवणा येथील दिव्या बार पुढे बेळ सांगवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर दिनांक 19 फेब्रुवारी च्या मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी देशी दारूची विक्री करत असताना आढळून आला. त्याच्याजवळ देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीचे कागदी लेवल असलेल्या काचेच्या 180 एम एल च्या 35 बॉटल प्रति बॉटल 70 रुपये प्रमाणे 2450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच विनापरवाना बेकायदेशीर चोरटी विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने अवैध देशी दारू कब्जात बाळगली म्हणून सहाय्यक फौजदार पीर मोहम्मद शेख यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. वाढवणा पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज मोहिमेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अशा पद्धतीने धाडसत्रामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत, असे म्हटले तर वावगे होणार नाही.