कासार सिरसीत आमदार चषक संपन्न प्रथम पारितोषिक मानकरी रहिमतहुल्लाहा स्पोर्ट्स राजेशूर
निलंगा (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसी ( ता. निलंगा ) येथे आपल्या देशाचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त औसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या वतीने आमदार चषकाचा आयोजन करण्यात आले होते.खेड्यापाड्यातील युवकांच्या अंगी असलेला कला, गुणांचा कौशल्याचा कौतुक व्हावा, त्यांना व्यासपीठ मिळावा, उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत, खेळाप्रती आवड निर्माण व्हावी, यासाठी आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या वतीने गाव वाईज टेनिस क्रिकेट स्पर्धा आमदार चषकाचे उदघाटन औसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांचे चिरंजीव ऑड, परीक्षेत पवार यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले होते.
यामध्ये प्रथम पारितोषिक 51001 रुपये तर द्वितीय पारितोषक 25001 रुपये तृतीय पारितोषक 15,001 रुपये, चतुर्थ पारितोषक 11001 रुपये पाचवे पारितोषक 7001, सहावे पारितोषक 6001, सातवे 5501, आठवे 5001 रुपये मॅन ऑफ द सिरीज 3100,रुपये बेस्ट बॉलर 2100 रुपये बेस्ट बॅट्समन 2100, रुपये असे अनेक वैयक्तिक पारितोषिक आणि ट्रॉफी ही मोठ्या प्रमाणात होते. या स्पर्धेमध्ये उत्तम अशी कामगिरी करत अंतिम सामना डी,जे बाबळगाव वर्सेस रहमतुल्लाहा स्पोर्ट्स राजेशुर या दोन संघात चुरशीची लढत पाहण्यास मिळाले. या मध्ये रहमतुल्लाहा स्पोर्ट्स राजेशुर ता, बस्वकल्याण या संघाने प्रथम फलंदाजी करत 8 ओव्हर मध्ये 104 रनाची शिखर घाटली याची पिछा करत डी.जे बाबळगाव जिल्हा लातूर याने प्राण पणाला लावून संघर्ष करत 1 बॉल 4 धावा असा संघर्ष केला परंतु चार धावाने पराभव स्विकरावा लागला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रहमतुल्लाहा स्पोर्ट्स राजेशूर या संघाला प्रथम पारितोषक 51001 रुपये नगद आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले, तर डी. जे बाबळगाव यांना द्वितीय पारितोषिक 25001रुपये नगद व ट्रॉफी देऊन खेळाडूंचा सन्मान करण्यात आले.
यावेळी कासार सिरसी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, मंडळ उपाध्यक्ष भास्कर पाटील मंडळ संघटक धनराज होळकुंदे, मंडळ अल्पसंख्यांक अध्यक्ष जिलानी बागवान, बहुजन समाज अध्यक्ष संदीप बनसोडे, युवा मोर्चा अध्यक्ष परमेश्वर बिराजदार मंडळ कृषी संघटक अध्यक्ष बालाजी बिराजदार वाडी कासार सिरसी सरपंच प्रतिनिधी नामदेव मंडले, उपसरपंच राहुल ईश्वरे,नाना धुमाळराम बंडगर,शहराध्यक्ष गोरख होळकुंदे,श्रीमंत मोरे,दीपक ढविले ,अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम खेळ दाखविल्याने मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हूणन या भागातील खेळाडू रायप्पा मंडले यांना नगद पारितोषक व ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले. बेस्ट बॉलर म्हणून राजू बाबळगाव, तर बेस्ट बॅट्समन वसीम राजेशूर यांची निवड करून यांना पारितोषक व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आले. तसेच चार भाषांमध्ये उत्कृष्ट असा कॉमेट्री केल्याबद्दल मेजर शशिकांत केदारे यांनचाही सन्मानित करण्यात आले. या यामध्ये अनेक गावातील टीम भाग घेऊन अनेक खेळाडूंनी आपल्याकडे असलेली खेळ दाखविले आणि या परिसरातील खेळप्रेमींनी खेळाचा आनंद घेतले.
या स्पर्धेचे आयोजन जय हो क्रिकेट क्लब कासार सिरसी, बेडर कन्हैया क्रिकेट क्लब वाडी कासार सिरसी, क्रांतिवीर क्रिकेट क्लब कोराळी वाडी ,यांच्या संयुक्त विद्युमनाने सुंदर असा आयोजन करण्यात आले होते. हा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.
या आमदार चषक मध्ये भाग घेतलेला सर्व खेळाडूंचा याला उत्तम साथ दिलेल्या प्रेक्षकांचं सुंदर असा आयोजन करून पार पडलेल्या सर्व आयोजकांचं भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे साहेब यांनी आभार मानले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. असे दर वर्षी स्पर्धेचे आयोजन करून खेड्या पाड्यातील काही उत्कृष्ट खेळ दाखवणाऱ्या खेळाडूंनची चाचणी घेऊन त्यांचा खेळ पाहून ग्रामीण भागातील खेळाडूंनचा दत्तक घेऊन नामवंत आकडीमी मध्ये ऍडमिशन करून खेड्यातील खेळाडूंचा आणि खेळाचा मान उंचवावा अशी विनंती येथील खेळ प्रेमीयाकडून या भागातील लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्याकडे करण्यात येते आहे.