अहमदपूरच्या ओम शांती केंद्रात शिवरात्री महोत्सव उत्साहात साजरा

अहमदपूरच्या ओम शांती केंद्रात शिवरात्री महोत्सव उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : आज समाजातील प्रत्येक घटक आपल्या कौटुंबिक कामांमध्ये व्यस्त असल्याचे सांगून त्याला स्व विकासा साठी वेळ नाही. म्हणूनच मानवी जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी स्वतःचे आत्मज्ञान जागृत करा असे आग्रही प्रतिपादन उदगीर ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या प्रमुख राजयोगिनी महानंदा दीदी यांनी केले. त्या दि. 17 रोजी महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला येथील ईश्वरीय विश्व विद्यालय राजेयोग भवन येथे 87 वा शिवरात्री महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक विजय गुंडाळे, उद्योजक गोपाळ गादेवार, महात्मा बसवेश्वर पुरस्कार विजेते राम तत्तापुरे, केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी छाया दीदी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना महानंदा दीदी म्हणाल्या की, जीवनात पैशापेक्षा सुख, शांती, समाधान महत्वाचे असल्याचे सांगून काम, क्रोध, मत्सर, मोह, माया या विकारापासून दूर राहिलो तरच आपल्याला अध्यात्म कळेल. त्यामुळे आपले मनोबल वाढवण्यासाठी आत्मज्ञान योगाचा अभ्यास करण्याचे जाहीर आवाहन केले. यावेळी राम तत्तापुरे यांनी माउंट आबू येथील मधुबनच्या अनुभवाचे कथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाया दिदी यांनी सूत्रसंचालन आशा रोडगे यांनी तर आभार जितू भाई यांनी मांनले.

About The Author