नागझरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर

नागझरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर

अहमदपूर (गोविंद काळे) : “स्पर्श” द एम्फाटिक टच सेवाभावी संस्था, नागझरी व लायन्स क्लब उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने नागझरी येथे मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर ठेवण्यात आले होते. आमच्या गावचे भूषण (डी आय जी) मंचक ईप्पर आयपीएस यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गावामधे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये गावकरी व भाविक भक्त यांना डोळे तपासणी करता यावी म्हणून शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी 80 नागरिक, माता भगिनी व बालकांनी डोळे तपासणी करून घेतली त्यापैकी 19 जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात आले आहे. यांची अतिशय अल्प दरात उदगीर येथे लवकरच शस्त्र क्रिया होणार आहे. या प्रसंगी गावचे सरपंच रामकिशन सुर्यवंशी, सोसायटी चे चेरमान अंकूश ईप्पर, ज्ञानोबा ईप्पर, उत्तम सुर्यवंशी, गंगाधर ईप्पर, बालाजी ईप्पर, बालाजी नागरगोजे, शिवराम उगिले, गांगाधर नकुले, डॉ तीवाडी सर, डॉ गायकवाड सर उपास्थित होते. शिबिराचे आयोजन गावचे उपसरपंच उधव ईप्पर यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!