देवणी तालुक्यात सरसकट पिकविमा मिळावा – मुख्यमंत्री यांना निवेदन

देवणी तालुक्यात सरसकट पिकविमा मिळावा - मुख्यमंत्री यांना निवेदन

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी व तालुक्यात खरीप हंगामातील सर्व पिकांचे अतिवृष्टी, गोगलगाय, व पावसात खंड आदी संकटाने संपुर्ण नुकसान झालेले आहे. उडीद, मुग, ज्वारी,सोयाबीन, तुर आदीसह विवीध पिकांचे तसेच फळबाग व फूलशेतीचे या संकटाने माती केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थीक कंबरडे मोडले आहे. यावेळी मदतीची गरज असताना विमा कंपनीकडून छळ केला जात आहे.महाराष्ट्र शासनाने सरसकट आर्थिक मदत अनुदान स्वरूपात दिली आहे. याच धर्तीवर पिकविमा धारकाना सरसकट पिकविमा देण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. लातूर जिल्ह्याची आनेवारी पन्नास टक्के पेक्षा कमी आली आहे.ज्या शेतकऱ्यांचे ऊरले सुरले पिक उत्पन्न आलेले होते, त्यांचेही काढणी पश्चात झालेल्या अतिवृष्टीत संपूर्णता नुकसान झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत पिकविमा कंपनीकडून होत असलेला अन्याय थांबवुन, देवणी व तालुक्यातील पिकविमा धारकांना सरसकट पिकविमा देवुन मदत करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

अन्यथा पिकविमा कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ही निवेदनात नमुद केला आहे. निवेदन नायब तहसीलदार सविता माडजे यांना देण्यात आले. यावेळी आनंद बस्वराज जिवणे, मनोज प्रकाश पाटील, श्रीमंत नागप्पा लुल्ले, योगेश मल्लीकार्रजुन तगरखेडे, नरसिंग विठ्ठलराव नागराळे विळेगाव, विश्वंभर लक्ष्मणराव पाटील लासोणा, ज्ञानोबा पुंडलिकराव पांडे विळेगाव, मालबा रामराव घोणसे तळेगाव, रामचंद्र पांडूरंग गौंडगावे कमालवाडी, मचकुरी महंमदरफी बडेसाब लासोणा, वाघमारे गणपत माधव हिसामनगर, निळकंठ बिरादार हंचनाळ, शिवराज बिरादार वडमुरंबी, नागनाथ स्वामी वडमुरंबी, सुधाकर रेवणप्पा पाटील संगम, शिवदास पाटील नेकनाळ, शंकर पाटील नेकनाळ, सन्मुख स्वामी वडमुरंबी आदींसह तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!