नागतीर्थवाडी येथे घेण्यात आली केंद्रास्तरीय शिक्षण परिषद
देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी येथे तळेगाव भो.केंद्रांतर्गत सर्व जिल्हापरिषद शिक्षकांसाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा नागतीर्थवाडी व जिल्हा परिषद शाळा ममदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली.या शिक्षण परिषद दरम्यान तळेगाव भो.केंद्रांतर्गत सर्व शाळेतील कामकाजाचा आढावा,विद्यार्थी अध्ययन व निष्पत्ती व विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेत राबविण्यात येणार नावीन्यपूर्ण उपक्रम, अशा सर्व विषयावर आधारित कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंबडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच राज गुनाले,ग्रामसेवक श्यामसुंदर क्षीरसागर,देवणी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी व्यंकटराव बोईनवाड,तळेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख ज्ञानोबा कारले, केंद्रीय मुख्याध्यापक शिवाजी भंडे,साधन व्यक्ती विष्णुदास मोरे,पांडुरंग वाघमारे यांच्यासह केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव हलगरे मुख्याध्यापक ममदापूर, यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी गुंजरगे मुख्याध्यापक नागतीर्थवाडी, सहशिक्षिका शारदा गुंगे,सूचित मोटाळे आदींनी परिश्रम घेतले.
