गंगनबीड येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
कमालनगर (एल.पी.उगीले) : सीमाभागातील बिदर जिल्ह्यामधील कमालनगर तालुक्यातील दापका सर्कल मधील गंगनबीड येथील अंगनवाडी या ठिकाणी संजीवणी बहुउद्देशिय संस्था लातूर व कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनी लिमीटेड, कमालनगर यांच्या संयुक्त उद्यमाने गंगनबीड येथील ओमप्रकाश पाटील अरविंदराव पाटील, सुभाष वाडीकर, गोपाळराव पाटील, शिवराज बिराजदार, दिनकरराव बिरादार, सोपानराव हाट्टे, संतोष राठोड, शेतकरी,कामदार,कष्टकरी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रीया शिबीर घेण्यात आले. यावेळी संजीवणी बहुउद्देशिय संस्थे तर्फे डॉ. मोहसीन शेज, श्रीमती राजनंदीनी मॅडम, श्रीमती अनिता मॅडम व सुरेश मराठे यांनी सेवा बजावली. शिबीर आयोजन व शिबीराची कल्पना अंकुश वाडीकर यांनी पुढाकार घेत शिबीर यशस्वितेसाठी पार पाडले. या शिबीराचे सर्व ग्रामस्थांनी लाभ घेतला. व 100 हुन अधिक तपासणी करुन घेतली, व 8 जणांना शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यात आली. शेतातील बरीच काम आटोपली आहेत. सध्या शेतकऱ्यांना वेळ उपलब्ध आहे. त्याचा त्यांना लाभ व्हावा, या उद्देशाने कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनी लिमीटेडने संजीवणी बहुउद्देशिय संस्थेस विनंती करुन हे शिबीर आयोजीत केले, त्या विनंतीस मान देऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्या बद्दल कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनी लिमीटेडचे संचालक अंकुश वाडीकर, प्रदीप बिरादार व बालाजी जाधव यांनी संजीवणी बहुउद्देशिय संस्थेचे आभर व्यक्त केले, भविष्यातही अशीच सेवा मिळत राहील अशी या ठिकाणी आशा व्यक्त केली.
