पाच महिन्याच्या विश्रांती नंतर पुन्हा वाळू तस्कर सक्रिय
वाढवणा बु.(हुकूमत शेख) : वाढवणा पासुन जवळच असलेल्या तेरू नदी डांगेवाडी पात्रातून खुलेआम कुणालाच न भिता, न जुमानता नदी पात्रात पोकलेनने अवैध वाळू उपसा चार दिवसापासून जोरात चालु आहे. रात्री बारा एक वाजता अवैध वाळू टिप्पर, ट्रॅकटर मध्ये वाळू भरून उदगीर, अहमदपूर कडे जात असुन संबंधित महसूल खाते तलाठी यांना माहिती असुन देखील कोणतीच कार्यवाही करत नसल्याची चर्चा परिसरात जोरात चालु आहे. लाखो रुपयाचे महागडे पोकलेन, टिप्पर, ट्रॅकटरने राज रोसपणे अवैध वाळू उपसा करून रात्री ट्रकटर, टिप्परणे वाहतूक करीत आहेत. मात्र संबंधित वाढवणा सज्जाचा तलाठी यांना माहिती विचारली असता, काहीच बोलायला तयार नाहीत. चार पाच महिन्या पासुन बंद असलेला अवैध वाळू उपसा चालु झाला आहे. संबंधित प्रशासन मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प दिसत आहे. तरी कर्तव्य दक्ष लातुर जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी जातीने लक्ष घालुन लाखो रुपयाचा शासनाचा महसूल बुडवून अवैध मार्गाने वाळू उपसा करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याची जानकार ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.