महात्मा पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

महात्मा पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

उदगीर (एल.पी.उगीले) : थोर समाज सुधारक श्री संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त महात्मा पब्लिक स्कूलमध्ये अभिवादन करून, शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. या परिसर स्वच्छतेमध्ये विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे संचालिका संगीताताई पाटील नेत्रगावे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाळेतील सर्वांना शुभेच्छा दिल्या. शाळेतील सर्व विद्यार्थी या जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. सर्वांनी गाडगेबाबा यांना अभिवादन केले. गाडगेबाबांनी दिलेला आदर्श स्वच्छता आणि समता याचा अवलंब करून स्वच्छता केली. याप्रसंगी संचालिका सौ संगीता नेत्रगावे, मुख्याध्यापिका सौ. स्मिता तिवारी, शिक्षिका मोनिका मॅडम, शिवकन्या मॅडम, जयश्री मॅडम , अश्विनी मॅडम, शिल्पा मॅडम व पांचाळ मावशी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला.

About The Author

error: Content is protected !!