संत तुकाराम विधी महाविद्यालयास न्यायमूर्ती निखिलजी चव्हाण यांची भेट

संत तुकाराम विधी महाविद्यालयास न्यायमूर्ती निखिलजी चव्हाण यांची भेट

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील संत तुकाराम विधी महाविद्यालयास तिसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा तालुका न्याय दंडाधिकारी निखिलजी चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी महाविद्यालयाची प्राध्यापक अड.राजकुमार नावंदर ,कार्यालयीन अधीक्षक अजय कांबळे, संजय वाघमारे, दिपक बोडके , जावेद मुजावर, सत्यम खोमणे यांची उपस्थिती होती. यावेळी संभाजी कांबळे, एल.एल. बी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाचे विद्याथीॅ उपस्थित होते. प्राध्यापक विधीज्ञ राजकुमार नांवदर याच्या हास्ते न्यायमुतीॅ निखील चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संत तुकाराम विधी महाविद्यालयतील परिसर, वर्गअध्यापन, वर्ग, मुट कोर्ट तेथील बैठक व्यवस्था पाहुन मार्गदर्शन पर माहीती देण्यात आली. विद्याथीॅ, प्राध्यापक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!