विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा
700 विद्यार्थ्यांनी नोंदवला कथालेखन स्पर्धेत सहभाग

विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा<br>700 विद्यार्थ्यांनी नोंदवला कथालेखन स्पर्धेत सहभाग

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी विभागातर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विद्यार्थी व शिक्षकांसाठी आयोजन करण्यात आले होते.यामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी कथालेखन तर शिक्षकांसाठी मराठी स्वाक्षरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.कथालेखन स्पर्धेत एकूण ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तर मराठी स्वाक्षरी स्पर्धेत ७० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

मराठी दिनाचे औचित्य साधून मराठी शिक्षिका अंबिका पारसेवार यांच्या नैपथ्याखाली मराठी वाड्मयाचा परिचय देणाऱ्या सुंदर नाटिकेचे सादरीकरण झाले.यामध्ये आठवी ड च्या मुली सहभागी होत्या. याप्रसंगी सुप्रिया बुधे यांच्या मार्गदर्नाखाली तयार करण्यात आलेल्या मराठी कवितेच्या हस्तलिखिताचेही प्रकाशन करण्यात आले.कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्त आठवी ग या वर्गातर्फे विद्यालयाला प्रतिमा भेट देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी ,पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर ,लालासाहेब गुळभिले , माधव मठवाले, अभ्यासपूरक मंडळप्रमुख बालाजी पडलवार व विनायक इंगळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य शिंदे,प्रास्ताविक त्रिवेणी पाटील तर आभार वैष्णवी कांबळे हिने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एकनाथ राऊत,मराठी विषय प्रमुख अनिता यलमटे ,अनिता मुळखेडे,संतोष गजलवार,आशा कल्पे,आशा मोरे व सतीश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!