राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे यश
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा भंडारा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या 14 वर्षीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत राज्यस्तरीय स्तरावर लातूर जिल्ह्याने कास्यपदक प्राप्त करून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामध्ये आदित्य येरगे या विद्यार्थ्याने ब्रांन्झ पदक मिळवून यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्याला आकाश अरुण बनसोडे या क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या यशा बद्दल संस्था अध्यक्ष मा.गणेश दादा हाके पाटील,संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे यांनी अभिनंदन व कौतुक केले. या विद्यार्थ्याला क्रीडा शिक्षक आकाश बनसोडे यांनी अत्यंत जिद्दीने त्याची तयारी करून घेतली. शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ही त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
