मराठी भाषेला मराठी साहित्यिकांनी समृद्ध केले – गणेश हाके पाटील यांचे प्रतिपादन

मराठी भाषेला मराठी साहित्यिकांनी समृद्ध केले - गणेश हाके पाटील यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : आपल्या लाडक्या मराठी भाषेला संत ज्ञानेश्वरां पासून खूप मोठा वारसा लाभला असून मराठी साहित्यात खूप मोठे लिखाण झालेले आहे. मराठी साहित्यिकांनी सर्व अंगाने मातृभाषेला समृद्ध केले असल्याचे आग्रही मत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके यांनी केले आहे. ते 27 रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वि.वा.शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साहित्यिक प्रा.द.मा.माने, उपक्रमशील शिक्षक राम तत्तापुरे, मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे,मीना तोवर यांची उपस्थिती होती.यावेळी प्रा. द.मा.माने, राम तत्तापूरे यांचे मराठी गौरव दिनाच्या निमित्ताने मनोगतपर भाषणे झाली. विविध क्षेत्रातील गुणवंताचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्वरचित काव्य वाचन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन करून राज्यगीताने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख संगीता आबंदे-पाटील यांनी केले तर आभार उद्धव शृंगारे यांनी मानले. सोहळ्याची सांगता पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!