आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते २० लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्ता भूमिपूजन सोहळा !
अहमदपूर (गोविंद काळे) : चाकुर मौजे जानवळ येथे जनसुविधा योजनेअंतर्गत २० लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्ता भूमिपूजनाचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपस्थित आमदार बाबासाहेब पाटील यांनी भूमिपूजन करून ग्रामस्थांशी संवाद साधत असताना विकासकामांना आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले. दूरदृष्टीकोनातून आणि सम्यक नियोजनातून मतदारसंघाचा विकास साधण्यावर आपण भर देत आहोत. आगामी काळातही अनेक विकास कामे हाती घेतली जातील.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच भागवतराव कुसंगे, ॲड.बाळासाहेबजी माने, ता.अध्यक्ष शिवाजीराव काळे, रणजित दादा पाटील, निलेशजी राजमाने सर, अनिलराव वाडकर, परिमल संस्थेचे बाबुरावजी जाधव सर, उद्योजक तुकारामजी जाधव पाटील, प्रा.सचितानंदजी ढगे सर, ॲड.दासराव शिरुरे सर, चेअरमन अरविंदराव साबदे, बिलाल पठाण, गणेश शिंदाळकर, समाधान जाधव, उमेश कर्डीले, सरपंच कारेपूर प्रवीण माने, दत्ताभाऊ पवार, प्रा.यादव कर्डीले, दगडू जाधव, धनाजी पाटील, महादेव पाटील, माचवे, रघुनाथ बेडदे, सुभाष घोडके, सुशील पाटील, बाहेती, नागनाथराव पकाले, उपसरपंच जानवळ अच्युतराव कदम, महेंद्रकुमार आचार्य, मुकेशजी राजमाने, सुभाषराव घोडके, बालाजी माचवे, सुधाकरराव लोहारे, गजानन पाटील, डॉ.कांबळे सर, माजी चेअरमन बळीराम खसे, पत्रकार साखरप्पा वाघमारे, धर्मराज साबदे आदी मान्यवर उपस्थित होते.
