३ कोटी ६३ लक्ष रूपयांच्या विविध विकासकामाचे भूमीपूजन आणि ३१ लक्ष रूपयांच्या योजनांचा लोकापर्ण सोहळा !
अहमदपूर (गोविंद काळे) : चाकुर तालुक्यातील मौजे सुगांव येथे ३ कोटी ६३ लक्ष रूपयांच्या विविध विकास कामाचा भूमीपूजन आणि ३१ लक्ष रूपयांच्या योजनांचा लोकापर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून विकासकामांचे भूमिपूजन करत लोकार्पण केले. तसेच नवनिर्वाचित शिक्षक आमदार विक्रमजी काळे आणि संचालक बाबूराव गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
नियोजनात्मक विकास साधण्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करणे आणि उपलब्ध करून देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे आद्य कर्तव्य आहे. याच कर्तव्याच्या जाणिवेतून मतदारसंघात आवश्यक विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देत आहे. महत्वाकांक्षी कामे मार्गी लावण्यासाठी केलेला पाठपुरावा कामी आला, असे मत यावेळी व्यक्त केले.
विकासकामांमध्ये मुरंबी- सुगांव रस्त्यावरील १ कोटी ८० लक्ष रूपयांचा सिमेंट रस्ता, जल जीवन पाणी पुरवठा योजने अंतर्गतच्या १ कोटी ६६ लक्ष रूपयांची पुरक पाणी पुरवठा योजना, आमदार निधी अंतर्गत सिमेंट रस्ता १० लक्ष रुपये, ग्रामपंचायत वित्त आयोग अंतर्गत बंदीस्त नाली ५ लक्ष रूपये तसेच पेव्हर ब्लॉक २ लक्ष रूपये अशा एकूण ३ कोटी ६३ लक्ष रूपयांच्या विविध विकास कामाचा भूमीपूजन व ३१ लक्ष रूपयांच्या सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, विंधन विहीरी व पेव्हर ब्लॉक या योजनांचा लोकापर्ण यांचा समावेश आहे.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ मनाळे, सरपंच प्रियांकाताई शक्ति अर्जुने, उपसरपंच हरिभाऊ काळे, चेअरमन सोपानराव मनाळे पाटील, माजी उपसभापती पद्माकरराव पाटील, माजी संचालक बालाजीदादा सूर्यवंशी, युवा नेते सुमित भैय्या उत्तमराव वाघ, सरपंच मार्शल माने, कोषाध्यक्ष गणेशराव शिंदाळकर, शहराध्यक्ष बिलाल खा पठाण, ज्येष्ठ नेते शिवाजीराव भूत्ते, , सदस्य मारोतीराव भुत्ते, ज्येष्ठ नेते मोहनराव जाधव, नेते नरसिंग पाटील, सरपंच सुनील चिंताले, विजयकुमार शेळके, पप्पू सावंत, सागर हुडगे, अमोल सावंत, संदीप शेटे, राम केंद्रे, समाधान जाधव, सोमेश्वर शिंदगे, शहराध्यक्ष शिवशंकर हाळे, तालुका उपाध्यक्ष गणपतराव नितळे, तालुका उपाध्यक्ष गणपतराव कवठे, , ज्येष्ठ विधीज्ञ संतोष गंभीरे, चेअरमन शेषराव मुंजाणे, तालुकाध्यक्ष राहुल सुरवसे, माजी चेअरमन यशवंतराव जाधव, सरपंच ताजुद्दीन घोरवाडे, भीमाशंकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम जाधव, तालुका सरचिटणीस व्यंकटराव पाटील, तालुका उपाध्यक्ष हनुमंतराव लवटे, सरपंच भुजंगराव शिंदे, तालुका अध्यक्ष रामदास घुमे, सरपंच सावता माळी, युवा नेते यादवराव कर्डिले, दत्तारावनाना शिंदे, चेअरमन श्रीराम गायकवाड, सरपंच नामदेवराव शिंगडे, कैलास काळे, युवा सहकारी रामकिशन वाघमारे, सलीम पठाण, लिंबराज बोरगावे, राजेंद्र तेलंगे, ईश्वर डोंगरे, माधव शिंदे, धनाजी शिंदे, नामदेव मुडे, हरिदास मुडे, निवृत्ती वाघमारे, अनिकेत मुडे, पवन गाडे, उमेश सोनटक्के, रणजीत नागणे, धोंडीराम बाचपल्ले, लायक शेख, शिवाजी कटाळे, पिंटू टेलर बिराजदार, सुधीर मेखले, लक्ष्मण कातपुरे, चंदर अर्जुने, रमाकांत गायकवाड, हनमंत मेखले, अजय सूर्यवंशी, ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रास्ताविक रामदास दामोदर काळे यांनी केले.
