लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

उदगीर(एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सुधाकर पोलावार तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधव केंद्रे उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते डॉ.सी.व्ही.रमन व महर्षी अरविंद घोष यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.मान्यवर पाहुण्यांचे शाळेच्या वतीने पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी इयत्ता तिसरी चौथीच्या ३७ विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध प्रयोग खूप छान प्रकारे सादर केले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माधव केंद्रे यांनी नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रमन यांच्याबद्दल व त्यांनी लावलेल्या शोधाबद्दल, तसेच विज्ञानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.विज्ञानामुळे अंधश्रद्धा नाहिशी होते.अग्नी पेटवण्याच्या प्रक्रियेतून विज्ञानाचा शोध लागला.विज्ञानाचे खूप फायदे आहेत.विज्ञानामुळे समाजात जागरूकता निर्माण होते.विज्ञान म्हणजे त्रिकालाबाधित सत्य आहे.असे मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोपपर भाषणात सुधाकर पोलावार यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात जादूटोणा,अंधश्रद्धा न बाळगता प्रत्येक गोष्ट चिकित्सक पद्धतीने केली पाहिजे.शास्त्रज्ञांची माहिती मिळवून वाचन करावे.सर्वांनी आपल्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन बाणवा,असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सौ.श्रीदेवी कबाडेबाई यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!