चोरीच्या गुन्ह्यात महीलेला अटक, चोरलेला 2 लाख रुपयांचा सोन्याचा गंठन हस्तगत

चोरीच्या गुन्ह्यात महीलेला अटक, चोरलेला 2 लाख रुपयांचा सोन्याचा गंठन हस्तगत

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील चोरीच्या घटना वाढ झाल्याने या घटनेचा तपास करण्याच्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने लातूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत एका चोरीचा तपास पोलिसांनी उत्कृष्ट पद्धतीने लावला आहे.

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, प्रकाश नगर, लातूर येथे राहणाऱ्या एका घरातून चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे गुरनं 122/23 कलम 379,381 भादवी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होते.सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे एमआयडीसीचे चे पोलीस निरीक्षक दिवे यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना देण्यात आले होते.

तपासा दरम्यान पोलीस पथक गुन्ह्याची पद्धत व इतर बाबींचा विश्लेषण करून तसेच गोपनीय बातमीदार नेमून माहिती मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत होते. दरम्यान तपास पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावरून त्याच घरात मोलकरीणचे काम करणारी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले.तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, घरात काम करत असताना पर्स मध्ये ठेवलेले चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरी केल्याचे कबूल केल्याने सदर गुन्ह्यात अटक करून गेलेले सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार भोसले करीत आहेत.नमूद तपास पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतिशय कुशलतेने, गुन्ह्याच्या पद्धतीचा बारकाईने विश्लेषण व अभ्यास करून, गोपनीय माहिती मिळवून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे गंठण परत मिळविले आहे, सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिवे यांचे नेतृत्वातील टीम मधील पोलीस उपनिरीक्षक लोखंडे , पोलीस अंमलदार भिमराव बेलाळे, गोविंद चामे, बाळु भोसले, ज्ञानेश्वर काळगे, राम जाधव, पिराजी गोडबोले, महीला पोलीस अमलदार आचार्य यांनी चोरीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.

About The Author

error: Content is protected !!