लालबहादुर शास्त्री विद्यालयात बक्षीस वितरण संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलनात आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखक व माजी विद्यार्थी डॉ.संजय कुलकर्णी उपस्थित होते. तर प्रमुख अतिथीस्थानी गटशिक्षणाधिकारी शेख सफीर कासिम साब यांची उपस्थिती लाभली.याप्रसंगी संकुलाचे अध्यक्ष मधूकरराव वट्टमवार,केंद्रीय सदस्य तथा संकुलाचे कार्यवाह शंकरराव लासूणे,वसतीगृहाचे अध्यक्ष षण्मुखानंद मठपती,प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष व्यंकटराव गुरमे,संस्था सभासद परमानंद निलंगे,मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड ,अंकुश मिरगुडे,प्राचार्य श्रीपाद सीमंतकर ,विद्यार्थी प्रतिनिधी श्रेया पुल्लागोर व वैभव एकंबेकर यांची विशेष उपस्थिती होती.प्रारंभी सरस्वतीमाता , योगी अरविंद व विज्ञानदिनानिमित्त सी,व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकातून अभ्यासपुरकमंडळ प्रमुख बालाजी पडलवार यांनी स्नेहसंमेलनाच्या आयोजना मागील भूमिका मांडली, तर उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी संपूर्ण स्नेहसंमेलनाचा अहवाल मांडला. नववी वर्गातील श्रद्धा उप्पे या विद्यार्थींनीने विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले.
गुणवत्तेचे शिखर गाठलेल्या लालबहादुरच्या विद्यार्थ्यांनी विविध शालेय ,सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धातून विविधांगी क्षेत्रात यश मिळवावे,असे प्रतिपादन प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी शेख सफीर कासिम साब यांनी केले. तर अध्यक्षीय मनोगतातून डॉ.संजय कुलकर्णी यांनी त्यांच्या शालेय जीवनातील संमेलनाच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी दहावी सराव परीक्षेत अव्वल आलेले विद्यार्थी प्रतिनिधी श्रेया पुल्लागोर व वैभव एकंबेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्नेहसंमेलनात आयोजित केलेल्या वैयक्तिक व सांघिक अशा एकूण 21 स्पर्धांतून विजेते ठरलेल्या 750 विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली,या बक्षीस वितरण सत्राचे वाचन संमेलन प्रमुख अनिता यलमटे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता मुळखेडे ,स्वागत परिचय एकनाथ राऊत यांनी केले, तर वैयक्तिक पद्य मुकुंद मिरगे व शांतीमंत्र किरण नेमट यांनी गायले.तसेच आभारप्रदर्शन संमेलन सहप्रमुख लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर ,लालासाहेब गुळभिले , माधव मठवाले ,संतोष कोले,गुरूदत्त महामुनी संदीप पाटील,निलेश मांडवकर यांनी परिश्रम घेतले.
