अतनुरात शिवजन्मोत्सव सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा

अतनूर (एल.पी.उगीले) : येथे शिवजयंती निमित्ताने दररोज वेगळेवेगळे विविध उपक्रम ठेवून शिवजन्मोत्सव सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या शिवजन्मोत्सव सप्ताहात भवानी माता पुजन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुजन, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे पुजन, ध्वजारोहण, भव्य रक्तदान शिबीर, मोटारसायकल रॕली, रांगोळी स्पर्धा, भव्य मिरवणूक, शिव व्याख्यात्ते खंडू डोईफोडे यांचे भव्य शिवव्याख्यानाने सप्ताहाची सांगता झाली.

अतनुरात शिवजन्मोत्सव सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा

या सप्ताहात माजी गृहराज्यमंत्री आ. संजय बनसोडे, माजी आ.सुधाकर भालेराव, सरपंच चंद्रशेखर पाटील, ग्राहक संरक्षण समितीचे अशासकीय सदस्य बालासाहेब शिंदे अतनूरकर, काँग्रेसचे जळकोट तालुकाअध्यक्ष मारूती पांडे, काँग्रेस युवक जिल्हाअध्यक्ष विजय निटुरे, शिवसेनेचे जिल्हासरचिटणीस विकास सोमुसे-पाटील, उध्दव ठाकरे शिवसेनेचे जळकोट तालुकासंघटक मुक्तेश्वर पाटील, असंघटित कामगार काँग्रेसचे जळकोट तालुका अध्यक्ष कैलास सोमुसे-पाटील, उपसरपंच बाबू कापसे, भाजपा जळकोट तालुका उपाध्यक्ष ईश्वर कुलकर्णी, पोलीस पाटील प्रकाश पाटील, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, संघटक माधव बोंडगे, दिलीप कोकणे, गंगाधर वाघमारे, संजय येवरे, गोविंद बारसुळे, श्रीकांत बोडेवार, रोहित पांचाळ, बळवंत भांगे, विनोद सोमुसे, सुदाम बाबर,सैलानी शेख, गोविंद कोकणे, सौरभ शिकारे, बाजीराव कापडे, आदित्य बोडेवार, माधव सोमुसे उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!