अवैध दारूचा साठा ठेवून दारू विक्री करणा-या संतोष नाबदे वर गुन्हा दाखल
शिरुर अनंतपाळ पोलीसांची उत्कृष्ट कारवाई
शिरूर अनंतपाळ ( प्रतिनिधी ) : मा.श्री.निखील पिंगळे पोलीस अधिक्षक,लातूर यांचे आदेशाने अवैध धंदयाना आळा घालण्यासाठी शिरुर अनंतपाळ पोलीसांनी अनाधिकृतरित्या देशी दारुची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी पत्र्याच्या शेड मध्ये साठा करणा-या इसमांवर कारवाई करण्यात आली. ज्यात संत्रा, टॅगो चे बाॅक्स , किमंत 38400 असा एकुण रुपयाचा मुद्येमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दिनांक 8/4/2020 गुप्त माहीती काढुन गंगाधर नाबदे यांच्या शेतात विनापासपरवाना बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने स्वताःचे आर्थिक फायदयासाठी अनाधिकृतरित्या विनापास परवाना देशी दारुची चोरटी विक्री व्यवसाय करीता देशी दारु चे 16 बाॅक्स सह संतोष श्यामराव नाब्दे वय ४१ वर्ष रा.शिरुर अनंतपाळ याच्यावर बेकायदेशीर रित्या देशी दारु असली धार संत्रा टैंगो कंपणीचे १६ बॉक्स मध्ये १८० एम एल च्या एकुण ७६८ सिलबंद बाटल्या किंमत अंदाजे ३८४००/-रुपये चा माल बाळगलेला मीळून आला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला.