युवा नेते ऋषिकेश कराड यांच्या हस्ते शुक्रवारी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे रेणापूरात उद्घाटन

युवा नेते ऋषिकेश कराड यांच्या हस्ते शुक्रवारी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे रेणापूरात उद्घाटन

लातूर (दयानंद स्वामी) : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील खेळाडूकरिता रेणापूर पिंपळफाटा येथे आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे युवा नेते ऋषिकेश कराड यांच्या हस्ते ३ मार्च २०२३ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. ऋषिकेशदादा कराड युवा मंच यांच्या वतीने लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील क्रिकेट खेळाडूंकरिता आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास ७१ हजार रुपये, द्वितीय येणाऱ्या संघास ५१ हजार रुपये, तृतीय येणाऱ्या संघास ४१ हजार रुपये आणि चतुर्थ संघास ३१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व आमदार चषक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर अशी हजारो रुपयांची वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

सदरील स्पर्धा रेणापूर पिंपळ फाटा नजीक हरीयोग पेट्रोल पंपाच्या शेजारी होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन ३ मार्च २०२३ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता भाजपाचे युवा नेते ऋषिकेश कराड यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी भाजपा लातूर ग्रामीणचे अध्यक्ष अनिल भिसे, तालुका अध्यक्ष अ‍ॅड. दशरथ सरवदे, ओबीसी मोर्चाचे मराठवाडा संयोजक डॉ. बाबासाहेब घुले, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर, महेंद्र गोडभरले, वसंत करमुडे, तहसीलदार उत्तम पवार, माजी उपसभापती अनंत चव्हाण, माजी नगराध्यक्षा आरती राठोड, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिजीत मद्दे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अनुसया फड, रेणापूर शहराध्यक्ष दत्ता सरवदे, सिद्धेश्वर मामडगे, शरद दरेकर, श्रीकृष्ण पवार, श्रीकृष्ण मोटेगावकर, अजित गायकवाड, शिवमूर्ती उरगुंडे, खलील ताशेवाले यांच्यासह रेणापूर तालुक्यातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी, खेळाडूंनी आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन व संयोजन समितीचे विजय चव्हाण, उत्तम चव्हाण, सौरभ कराड, रमा चव्हाण, धोंडीराम चव्हाण, बालाजी दुट्टे, गणेश राठोड यांच्यासह अनेकांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!