प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूरच्या वतीने अभिनव उपक्रम

प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूरच्या वतीने अभिनव उपक्रम

तणावमुक्त आणि बिनधास्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा…..

लातूर (प्रतिनिधी) : रोजी प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूर च्या वतीने तणावमुक्त वातावरणात परिक्षा देण्यासाठी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत शुभेच्छा दिल्या.शहारातील बांधकाम भवन परिसरात लालबहादूर शास्त्री विद्यालयात परीक्षार्थीचे स्वागत करण्यात आले.दहावी परीक्षेचा पहिला दिवस या वर्गात असलेले विद्यार्थी अनेक महिन्यापासून अभ्यासाच्या तयारीत होते. अखेर या सर्व तणावात असलेले विद्यार्थ्यांना तणावमुक्त आणि बीनधास्तपणे परीक्षा द्यावे आणि कसलेही तणावात न राहता परीक्षा सोडवावी कांही अडचण असेल तर आपल्या मित्राशी,पालकांशी,शिक्षकासी चर्चा करून समजून घ्या आणि अडचण दूर करा तसेच खेळीमिळीच्या वातावरनात परीक्षा देण्याकरिता विध्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन देण्यात आले.यावेळी प्रतिष्ठानचे अँड.अजय कलशेट्टी,मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे,वीरशैव तेली समाज अध्यक्ष किशोर भुजबळ अँड.कल्पना भुरे,मुख्याद्यापक नरेंद्र गिरवलकर,अँड.सुरेश सलगरे, राजेश्वर हारनाळे,उमाकांत क्षीरसागर,मुन्ना भुजबळ,विशाल देशमाने, शिल्पा होनराव ,रामभाऊ लोखंडे,बालाजी साळुंके,एस. डी. बिराजदार,सौदागर लहाने,सुरेखा कुलकर्णी,सतीश बिराजदार,इंजिनियर राजू साबणे, गोपाळ खंडागळे,आंतेश्वर पाटील,दगडू देशमाने,आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!