छत्रपती विद्यालय कलागुणांच्या आविष्काराचे केंद्र – प्रा.मारोती बुद्रुक पाटील

छत्रपती विद्यालय कलागुणांच्या आविष्काराचे केंद्र - प्रा.मारोती बुद्रुक पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : कलाकार हा जन्माला येत नसतो त्याला निर्माण करावे लागते श्री छत्रपती शिवाजी विद्यालय ही शाळा कलागुणांच्या आविष्काराचे मुख्य केंद्र असुन शिक्षक हा त्याचा निर्माता आहे हिमालयाची उंची विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे भाग्य शिक्षकांनाच लाभले असल्याने त्याचा प्रमाणिकपणे वापर केल्यास जग विजेता निर्माण करता येतो असे प्रतिपादन प्रख्यात निवेदक व्याख्याते प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले.

राणी सावरगांव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून प्रा. मारोती बुद्रुक पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच राजेभाऊ जाधव हे होते तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून कॉमिडीचे बादशाह मराठी चित्रपट अभिनेते बळी डिकळे व अभिनेत्री वैष्णवी पटणे,पिंपळदरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विक्रम हराळे साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे डाॅ.बालाजी कारामुंगीकर, मधुकरराव जाधव, सर,नारायण जाधव,चेअरमन नागेश जाधव अदिची उपस्थिती होती.

पुढे बोलताना बुद्रुक पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये अनेक कलागुणांचा आविष्कार होत आहे. अध्यापनाबरोबर त्यांच्यामध्ये निर्णयक्षमता, आत्मविश्वास, कौशल्य, समुजूतदारपणा, माणुसकी,निसर्गप्रेम, नम्रता,चातुर्य, स्वावलंबीपणा,व नेतृत्व हरहुन्नरी व्यक्तिमत्व असे सर्व गुण अंगी विकसित करण्याचे काम शिक्षकच प्रमाणिकपणे करत आहेत.हे विद्यालय विद्वत्ता निर्माण करण्याचे केंद्रबिंदू आहे जगातील महान व्यक्तींना घडविण्याचे कार्य शिक्षकांच्या हातून झाले आहे. शिक्षक देशाचे आधारस्तंभ असून राष्ट्र निर्माण करण्यात शिक्षकांचा अनमोल वाटा आहे.छत्रपती शिवाजी विद्यालयाने ज्ञान अमृता बरोबर कलाकारांच्या सर्व गुणांचा कलाविष्कार शिक्षकांच्या माध्यमातून निर्माण केला आहे. मेट्रोसिटीतील लाजवेल अशा पद्धतीचे कार्यक्रम घेऊन मराठी बरोबर इंग्रजी आणि हिंदी विषयाचे परिपूर्ण अध्यापन शिक्षकांच्या माध्यमातून होत असल्याने ग्रामीण भागात एवढ्या कमी पैशांमध्ये विद्यार्थ्यांना शहरातल्या सुख सुविधा देणे हे कमालीचे कार्य केल्यानेच मुले पहिलीपासून इंग्रजी बोलत आहेत.शेतकरी कष्टकरी,शेतमजूर, पिचलेल्या खंगलेल्या विद्यार्थ्यांना घडविणे साधे सोपे काम नाही. संचालक शिवसांब कोरे व त्यांच्या टीम ने केलेले कार्य निश्चितच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा उद्धार करणे अनमोल कार्य आहे. कलाकार जन्माला येत नसतो त्याला निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची असते एखादा मूर्तिकार ज्याप्रमाणे दगडाला आकार देतो त्या पद्धतीने ती मूर्ती आकार घेत असते तेच कार्य शिक्षकाचे आहे. शिक्षक जर अष्टपैलू असतील तर विद्यार्थीही त्याच पद्धतीने घडतात. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकविण्याची कार्य कमालीचे आहे आजचे शिक्षण हे स्पर्धेचे असून या स्पर्धेमध्ये विद्यार्थी उतरल्यास तो आपल्या ग्रामीण भागाचा उद्धार करू शकतात. शिक्षणाकडे केवळ शिक्षकांनीच नाही तर पालकांनी जबाबदारीने लक्ष घालने गरजेचे असून मुलांना टीव्ही आणि मोबाईल पासून दूर ठेवल्यास मुलावर चांगले संस्कार होऊ शकतात.आज मुले व्यसनाधीन झाले आहेत इंटरनेटच्या महाजालात विद्यार्थी सापडल्याने त्यांना मैदानी खेळ आणि कलागुणांचा आविष्कार अशा शाळेतून होणे गरजेचे आहे तेच कार्य श्री छत्रपती शिवाजी विद्यालय यांनी केल्याने ग्रामीण भागातील मुले प्रत्येक क्षेत्रातील नावारूपाला येत आहेत. रेणुका मंदिराच्या समोर लाल दिव्याच्या गाडीत याच शाळेचे विद्यार्थी ज्यावेळी येतील त्यावेळी निश्चितच गौरवाचा दिन असेल हे कार्य पुढील भविष्यासाठी नक्कीच होईल असे मला वाटते असेही प्रा.बुद्रुक पाटील यांनी सांगितले

यावेळी चित्रपट अभिनेते बळी डिकळे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की अभ्यास करा यशवंत व्हा गुणवंत व्हा किर्तीवंत व्हा कुठलेही काम सोपे नाही ते केले तर अवघडही नाही काम करण्याची तयारी ठेवा अशीही त्यांनी मुलांना हसवत खेळवत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले व प्रती वर्षाप्रमाणे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच समाजसुधारकांना सन्मान पत्र, ट्रॉफी,शॉल, फेटा व पुष्पहार घालून त्याच्या कार्याचा गौरव करीत पुरस्कार वितरण करण्यात आले ज्यात परभणीचे कांतराव देशमुख यांना महाराष्ट्र कृषी भुषण पुरस्कार, परभणीचे सचिन सरदेशपांडे यांना आदर्श उद्योजक गौरव पुरस्कार,सोलापूरचे मल्लीनाथ याळगी यांना जिवनगौरव पुरस्कार,पालमचे संशोधक शास्त्रज्ञ संभाजीराव शिराळे यांना महाराष्ट्र उद्योगरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सामाजिक सांस्कृतिक अध्यात्मिक गीते सादर केले. त्यांच्यासाठी केले श्रम त्यांनीच दाखविले वृद्धाश्रम, वंशाच्या दिव्या पायी नको पणती विजऊ आई या नाट्य कृतीने प्रेक्षकांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. देशभक्तीपर गीते आणि राष्ट्रीय एकात्मतेची आठवण करून दिली या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शिक्षकांनी शर्तीचे प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे संचालक अष्टपैलू आदर्श शिक्षक शिवसांब कोरे यानी केले यावेळी ते म्हणाले संस्थेचा आजपर्यंतचा निकाल शंभर टक्के असून अनेक विद्यार्थी एमबीबीएस साठी आता पात्र होणार आहेत शाळेचे क्रीडा क्षेत्रातील मिळालेले योगदान आणि पहिलीपासून मुले इंग्रजी बोलत असल्यामुळे या वर्षीही शाळेचे ऍडमिशन रेकॉर्ड ब्रेक झाले. पालकांचा विश्वास संपादन करून केवळ विद्यार्थ्यांचा विकास हेच ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवले आहे असे त्यांनी सांगितले.सुत्रसंचालन प्रत्येक गीतासाठी विद्यार्थ्यांनी इंग्रजी मध्ये केले कार्यक्रमाचे आभार केशव हाके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी प्रयत्न केले. सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी राणीसावरगाव सह ग्रामीण भागातील हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांची तोबा उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!