यशवंत विद्यालयाच्या उपमुख्याध्यापक पदी उमाकांत नरडेले तर पर्यवेक्षक पदी गजानन शिंदे यांचे निवड

यशवंत विद्यालयाच्या उपमुख्याध्यापक पदी उमाकांत नरडेले तर पर्यवेक्षक पदी गजानन शिंदे यांचे निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या यशवंत विद्यालयाच्या पर्यवेक्षक पदाची धुरा सांभाळणारे श्री उमाकांत नरडेले यांची उप मुख्याध्यापक पदी पदोन्नती तर सरस्वती विद्यालय कुमठा तालुका अहमदपूर येथून पदोन्नतीवर आलेले श्री गजानन शिंदे यांची पर्यवेक्षक पदी आज संस्थेच्या आदेशानुसार नियुक्ती देण्यात आली. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ आणि पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या निवडीबद्दल त्यांचे टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर, सचिव तथा शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, प्राचार्य व्ही व्ही गंपले, उपप्राचार्य गिरिधर घोरबांड, कोटा पॅटर्न चे समन्वयक कयूम शेख, पर्यवेक्षक दिलीप गुळवे, कार्यालयीन अध्यक्षीक सोमनाथ स्वामी, राम तत्तापुरे, राजकुमार पाटील, कपिल बिराजदार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!