प्रा. डॉ. सीमा अरुण मोरे (चिखलीकर )यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पीएचडी प्रधान
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले वरिष्ठ महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विषयाच्या प्रा. डॉ. सीमा अरुणराव मोरे यांना तत्त्वज्ञान विषयात पीएचडी पदवी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी माजी मंत्री डॉ. कमल किशोर कदम कुलगुरूडॉ.उद्धव भोसले कुलपती डॉ. अनिल काकोडकर प्र. कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे ,संचालक डॉक्टर दिगंबर नेटके, खासदार प्रताप पाटील चिखलीकर ,खासदार सुधाकर शृंगारे, माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
