शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लाईनमन बांधवांचा सत्कार

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लाईनमन बांधवांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महावितरण उपविभाग कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अझहरभाई बागवान व कलापुष्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष चंद्रशेखर भालेराव यांनी लाईनमन दिनानिमित्त गुलाबपुष्प व पुषपगुच्छ देऊन लाईनमन बांधवांना सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रधान यंत्र चालक सुधाकर माने लाईनमन हरिभाऊ पुंडे सुधीर शाखावाड गणेश पांचाळ गुणवंत गुळवे दिनेश करले सचिन मंगरुळे चंद्रशेखर भारती योगेश इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंद्रशेखर भालेराव सुधाकर माने यांनी लाईनमन दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. लाईनमन हरिभाऊ पुंडे यांनी आभार मानले.

About The Author

error: Content is protected !!