लोणीमोडच्या जि.प.प्रा.शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

लोणीमोडच्या जि.प.प्रा.शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील लोणीमोडच्या जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुगंधी भाग्यलक्ष्मी होत्या, तर प्रमुख पाहुणे लोणीच्या महिला सरपंच उषाताई भुजबळे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष चापलवाड सिमा ,माता पालक गटाचे अध्यक्ष शेख अजुंम,वाघमारे सिमा,अन्सारी मोबिना,शेख सलिमा,सुवर्णकार पुजा, सुर्यवंशी शुंभागी, वाघमारे निर्मला, यांचा सत्कार जि.प.प्रा.शाळा लोणीमोड तफेॅ करण्यात आला. मुख्याध्यापक संजय वाघमारे यांनी महिला दिना विषयी मार्गदर्शन केले. तसेच माता पालक यांना निपुण भारत अंतर्गत आयडीया व्हीडीओ दाखविण्यात आला. यावेळी महिला दिनाविषयी भाषण श्रेया सुर्यवंशी, जान्हवी केंद्रे, आलिया मुंजेवार, किर्ती काळे, राजनंदनी वाघमारे, स्नेहा सुरनर,सना पठाण, सिमरन अन्सारी, सोनाक्षी सुरनर, रोशनी कानुरे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संरपंच पती यमुनाजी भुजबळे संजय वाघमारे,संतोष फड, विद्याथीॅ व पालक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!