केंद्र सरकारच्या विरोधात रेणापूर काँग्रेसचे निदर्शने

केंद्र सरकारच्या विरोधात रेणापूर काँग्रेसचे निदर्शने

लातूर/रेणापूर (प्रतिनिधी) : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात बुधवार दि. ८ मार्च रोजी शहरातील  स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे समोर रेणापूर शहर व तालुका कॉग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवत सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा धोक्यात आणला आहे. अदानी उद्योग समुहामधे एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यवधी रुपये गुंतवण्यास मोदी सरकारने भाग पाडले.अदानी समूहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या ३९ कोटी पॉलिसीधारक व गुंतवणूकदारांचे ३३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर बँकांनी मिळून तब्बल ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. मोदी सरकारने काही खास उद्योगपतींसाठी नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात घातला आहे.

काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य जनतेच्या पाठीशी कायम उभा राहिलेला आहे. अदानी उद्योग समुहातिल गैरकारभाराची चौकशी व्हावी. महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या आदेशानूसार  राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख , माजी मंत्री अमित विलासराव देशमुख , लातुर ग्रामीणचे आ. धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या निर्देशानुसार  रेणापूर शहर व तालुका कॉग्रेसच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे समोर  निदर्शने करून “केंद्रातील मोदी सरकारचा निषेध असो” “अदानी चोर है” “चौकीदार चोर है” “जनतेच्या पैशाला संरक्षण मिळावे” “भाजपा हटाव देश बचाव” अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा रेणापूर तालुका  कॉग्रेस कमिटीचे  अध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, शहराध्यक्ष मतीन अली सय्यद,संगायो समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील, सेवादल कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष  हनमंत पवार , जिल्हा बँकेच्या माजी संचालिका इंदुबाई इगे , महिला कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षा पुजा इगे, बाळासाहेब करमुडे, अनिल पवार, अजय चक्रे पद्म पाटील,रमेश बोने, शिवाजी गाडे,सचिन इगे, प्रदिप काळे, महेश खाडप , तानाजी सुर्यवंशी, राज खाडप, अॅड. शेषेराव हाके,अॅड. मोहन सिरसाट , पंडीत माने,गणेश सौदागर, दादाराव कांबळे, रोहित गिरी  यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे व कॉग्रेस पक्षाशी  संलग्न असलेल्या  विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author