शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा अन्यथा अनुदान द्यावे – संतोष सोमवंशी

शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा अन्यथा अनुदान द्यावे - संतोष सोमवंशी

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात यावर्षी सातत्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पहिल्यांदा उशिरा पाऊस त्यानंतर अतिवृष्टी, त्यानंतर गोगलगाय असे सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहेत. यातून शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यभरात कांद्याचे भाव पडलेले आहेत, त्याला लातूर जिल्ह्यालाअपवाद नाही येथे चार पाच रुपये किलो दराने कांद्याची विक्री करावी लागत आहे. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहेत असे शासन सांगत असले तरी तसे आदेश येथे आलेले नाहीत. लातूर जिल्ह्याचे अनेक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेत आहेत शेतकऱ्यांना उत्पादन खर्च ही निघत नाही एवढा कमी भाव सध्या कांदा ला आहे तरी शासनाने कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे अन्यथा शेतकऱ्याला प्रतिक्विंटल तीनशे रुपये अनुदान द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी मेल द्वारे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा उपनिबंधक लातूर यांना निवेदन द्वारे केली आहे.

About The Author