श्यामलाल हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा

श्यामलाल हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक आनंद चोबळे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. सविता विक्रम संकाये व्यासपीठावर उपस्थित होत्या.तसेच व्यासपीठावर प्र. उप मु. बालाजी चव्हाण, प्र. पर्यवेक्षक राहुल लिमये, इंग्रजी विषय विभाग प्रमुख संजय देबडवार, सर्व महिला शिक्षिका व्यासपीठावर उपस्थित होत्या.महिला दिनानिमित्त शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचे तसेच विविध स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या प्रतिभा संपन्न विद्यार्थिनींचे शाळेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनी देवणे श्रुती, कमलापुरे खुशी, यांनी जागतिक महिला दिनानिमित्त प्रभावी भाषेत भाषण केले.महिला गौरव गीत सरशा रणमले यांनी प्रभावीरीत्या सादर केले.

प्रमुख अतिथी सौ. सविता संकाये यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मानवी जीवनातील महिलांचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले, व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय समारोपमध्ये शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. महिलांचा आदर,सन्मान,संरक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर आपल्या कार्याचा उल्लेखनीय ठसा उमटविलेला आहे, मानवी जीवनाच्या प्रगतीमध्ये महिलांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा वेळोवेळी गौरव करणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे, असे मत व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य, उपाध्यक्ष गिरीशजी मुंडकर, सचिव ऍड. विक्रम संकाये, सहसचिव अंजुमणी आर्य यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐतनबोने शीलन यांच्या मार्गदर्शनानुसार भंडे संजना, वाघमारे अक्षरा या विद्यार्थिनींनी केले, कार्यक्रमाचे आभार संजय देबडवार यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव हके, सईद शेख यांनी सहकार्य केले.कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

About The Author