अंगणवाडी मौजे गुरधाळ येथे जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : विविध नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या गुरधाळ येथील अंगणवाडीमध्ये तोंडचिर विभागातील जवळपास 25 गावच्या अंगणवाडी शिक्षिका व गुरधाळ गावातील बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्याचबरोबर भरड धान्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन गुरधाळ येथील अंगणवाडी शिक्षिका सौ.नागीणबाई गुंडप्पा पटणे यांनी केले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे आदर्श सरपंच व गावचे विकासपुरुष श्री.वैजनाथ झुंकुलवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून तोंडचिर विभागाच्या शिस्तप्रिय पर्यवेक्षिका सौ.आशाताई सूर्यवंशी, डॉ.सौ.पाटील, मुख्याध्यपिका सौ.अल्का बिरादार , गावचे तरुण तडफदार, कार्यसम्राट उपसरपंच प्रा.नंदकुमार पटणे, गावचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक राजकुमार साळुंके इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा गुरधाळ अंगणवाडीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सौ.नागीणबाई पटणे यांनी केले, व त्यानंतर मंचावर उपस्थित सौ.डॉ.पाटील मॅडम, सौ.आशाताई सूर्यवंशी , श्री.राजकुमार साळुंके , श्री.वैजनाथ झुंकुलवाड , श्री.नंदकुमार पटणे , मुख्याध्यपिका सौ.अल्का बिरादार , अंगणवाडी संघटनेच्या तालुका अध्यक्ष सौ.सुलोचना कनाडे इत्यादी मान्यवरानी महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित महिलांना योग्य असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी सौ.एस. एस. वाघमारे, सौ. छबूताई बिरादार, सौ.कौशल्या आडे, सौ.वसुमती राजुळे, सौ.कविता बिरादार, सौ.कल्पना पवार, सौ.शकुंतला खिंडीवाले, सौ.प्रभावती स्वामी, श्रीमती मीना भुताळे, सौ.क्रांता जाधव, श्रीमती कलावती भद्रे, सौ.अनिता चव्हाण, सौ.निलावती मिरकले, सौ.सविता राठोड, सौ.सुमन राठोड, सौ.सारिका पवार, सौ.सुनीता रंडाळे, सौ.संजीवनी भोसले, सौ.वनमाला चिवटे, सौ.झिमाबाई बिरादार इत्यादी अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होत्या. तर गावातील अनुश्री तरटे, ललिता बिरादार, ग्रामपंचायत सदस्या सौ.महादेवी स्वामी,शीतल पाटील, प्रिया नागठाणे, दिक्षा नागठाणे, कविता उजळँबे, विद्यावती कांबळे, प्रीती गायकवाड, साईकिरण कांबळे, शोभा पाटील, राधिका पाटील, लक्ष्मीबाई उडके, राधिका उडके, प्रयागबाई पटणे, शिल्पा कांबळे, अश्विनी गायकवाड, आरतिका गायकवाड, सत्यकला झुंकुलवाड, मानसी नागठाणे इत्यादी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपसरपंच प्रा.नंदकुमार पटणे, प्रास्ताविक सौ.नागीणबाई पटणे तर आभार प्रदर्शन सौ.आशाताई सूर्यवंशी यांनी केले.