लातूर जिल्हास्तरीय योगा स्पर्धा उत्साहात संपन्न
लातूर (एल.पी.उगीले) : योग कल्चर असोसिएशन महाराष्ट्र अंतर्गत योग कल्चर असोसिएशन लातूर व सखा क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा शासकीय दुध डेरी सभागृह उदगीर येथे राष्ट्रीय पंच,सखा क्रीडा मंडळ अध्यक्ष संदीप स. पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नंदिनी धनुरे, दैवशाली टेंकाळे, यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, या स्पर्धेचे उदघाटन डॉ महेश धुमाळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटील यांच्या उपस्थितीत योगा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माउंट लिटेरा झि स्कुलचे प्राचार्य- रोशन डी कोना यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व विजयी खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले. लातूर जिल्हास्तरीय योगा स्पर्धेमध्ये पारंपारिक योगासन, रिदमिक योगासन,अर्टीस्टिक योगासन या प्रकारामधुन, ०६ वर्ष,१० वर्षे , १५ वर्षे , २२ वर्षे, ३० वर्ष, ४० वर्ष, ५० वर्ष, ६५ वर्ष वरील या वयोगटातील जवळपास १२१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा यशस्वीतेसाठी सिकंदर आडे, पांडुरंग भंगे,कोन्डाई स्कूलचे संचालक गंगाराम पाटील, सोमेश्वर सुर्यवंशी, प्रतीक्षा मुंडकर, मधुमती बिरादार, मेघा तवर, गणेश चौधरी, ऋषीकेश चव्हाण, दक्ष मुंडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
लातूर जिल्हास्तरीय योग स्पर्धेमधून तीनही प्रकारातील पहिल्या पाच विजयी खेळाडूंना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच स्पर्धेतील सांघिक प्रथम क्रमांक माउंट लिटेरा झि स्कूल उदगीर यांनी मिळवले, सांघिक दुसरा क्रमांक जयहिंद पब्लिक स्कूल उदगीर यांना मिळाले, तसेच तीसरा क्रमांक सुवर्णमाता देशमुख कन्या विद्यालय उदगीर व कोंडाई इंटर नॉशनल इंग्लिश स्कूल उदगीर यांना मिळाले. टाइम्स पब्लिक स्कूल उदगीर, लाल बहादूर शास्त्री विद्यालय उदगीर, देवमाणूस आरोग्य केंद्र, एन एस कराटे स्कूल, झिमाई योग विद्यालय उदगीर, सखा स्पोर्ट्स, इत्यादीनी सहभाग नेदवला. यशाबद्दल बोलताना डॉ धुमाळे यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करताना सांगितले की, आरोग्य आणि मन स्वच्छ ठेवायचे असेल तर प्रत्येक शाळेमध्ये योगा प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यामुळे देशाला नव्हे तर जगात आरोग्य विषयी समस्या निर्माण होणार नाहीत, असे सांगितले.