सोमनाथपूर, मलकापूर तलाठ्याच्या चौकशीची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहराच्या लगत असलेले सोमनाथपूर व मलकापूर हे उदगीरचे उपनगर म्हणून ओळखले जातात, हे दोन गावे शहरालगत असल्यामुळे प्लॉट व जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या भागातील प्लॉटची रजिस्ट्री करायची असेल तर त्या प्लॉटचा म्हणजे सातबारा नोंद केल्याशिवाय प्लॉट खरेदी करणार व घेणार या दोघांचीही तलाठी कार्यालयाकडे ये जा सुरू असते सदरील सज्जातील प्लॉटची फेरफार करण्यासाठी सामान्य नागरिक गेले असता संबंधित तलाठी हे संबंधितांकडून लाखो रुपयाची मागणी करतात असा आरोप आहे.तसेच संबंधिताला कसलीही पावती न देता शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून शासनाची मोठी आर्थिक लूट करीत आहेत,असाही आरोप असून सोमनाथपूर, मलकापूर तलाठी कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी. यासाठी रि. पा. इं (आ ) युवक आघाडी उदगीरचे नितीन गायकवाड हे उपजिल्हाधिकारी उदगीर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत.