जागतिक महिला दिन उदयगिरी महाविद्यालयात विविध उपक्रमाने साजरा

जागतिक महिला दिन उदयगिरी महाविद्यालयात विविध उपक्रमाने साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्वरचित काव्य स्पर्धा व विद्यार्थ्यांची आरोग्य तथा हिमोग्लोबिन तपासणी असे उपक्रम राबविण्यात आले. विविध स्पर्धा अंतर्गत विजेत्यांना बक्षीस म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन प्रोत्साहित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तथा हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आले, हिमोग्लोबिन तपासणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि शासकीय रुग्णालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची आरोग्य तथा हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली, याचा 130 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. सदरील उपक्रमासाठी शासकीय रुग्णालयातील डॉ.जागृती वर्धमान, डॉ.भाग्यश्री सूर्यवंशी, डॉ.प्रणिता पाटील, डॉ.महेश वाघमारे हे वैद्यकीय अधिकारी तसेच लॅब टेक्निशियन रत्नदीप कांबळे व महेश कांबळे यांनी सहकार्य केले. महाविद्यालयातील एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.बी.एस.होकरणे, प्रा.डॉ.बी.एस.कांबळे तथा प्रा.डॉ.एस.व्ही.भद्रशेट्टे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

About The Author