महिलांनी अंधश्रद्धेच्या बेड्या तोडून प्रगती करावी – सुनील सोमवंशी
उदगीर (एल.पी.उगीले) : अंधश्रद्धेमुळे समाजाचा विकास होत नाही.महिलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून डोळस व्हावे.अंधश्रद्धेच्या बेड्या तोडून प्रगती करण्याचे आवाहन निडेबनचे माजी सरपंच सुनील सोमवंशी यानी केले. धीरजभैया मित्र मंडळातर्फे आयोजित जागतिक महिला दिनी कर्तबगार महिलांच्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना ते पुढे म्हणाले, महिलांनी शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे,आत्मनिर्भर व्हावे. विचार मंचावर निडेबनच्या कर्तव्यदक्ष सरपंच जयश्रीताई बेल्लाळे, सदस्या पुष्पाताई शिंदे, जिव्हाळा ग्रुप चे देविदास नादरगे, कृषी अधिकारी मनोज बेल्लाळे, दशरथ शिंदे, श्रीकांत जाणते, केशव भिवाजी वाचनालयाचे सचिव सूर्यकांत जगताप, विश्वनाथ माळेवाडीकर, सुधाकर जवळगेकर, चंद्रकांत रोडगे इ.मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर अर्चना गोपडे, सुरेखा सारोळे, छबुताई बोडके, शोभाताई सूर्यवशी, सविता जवळगेकर,शिलाताई दंडिमे इत्यादी कर्तत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कांबळे यानी केले तर पांडुरंग बोडके यानी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धीरज दंडिमे, श्रीकांत गोपडे, नर्सिंग जवळगेकर, किरण दंडिमे, धनाजी गोपडे इ.नी परिश्रम घेतले.