स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना व्यासपीठ मिळते – राहुल केंद्रे
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील तोगरी येथे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो, प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी वेगवेगळे प्रकारचे गुण आढळून येत असतात. कोणाला संगीतामध्ये आवड असते तर कोणाला खेळामध्ये आवड असते, कोण कला क्षेत्रामध्ये रमतो, तर कोनाला अभ्यासामध्ये रस असतो. अशा सर्व गुणांना स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून चालना मिळत असते. यासाठी प्रत्येक संस्थेने वार्षिक स्नेहसंमेलन व्यापक पद्धतीने केले पाहिजे. असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तोगरीच्या सरपंच स्वामी, उपसरपंच रवींद्र काळा, बसवराज महादा, पंडितराव पाटील, पप्पू पाटील, प्राध्यापक तेलंग, डॉक्टर मनोज महादा व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.