पतंजली योग समिती द्वारे महिला दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : पतंजली योग समिती उदगीर यांच्या वतीने आठ ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने योग्य शिबीर, योग मार्गदर्शन, आरोग्य तपासणी शिबिर त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला होता. या अनुषंगाने जागतिक महिला दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन आर्य समाज सराफ लाईन उदगीर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी मीनाक्षी स्वामी,सौ जयश्री धनश्री, सौ मधुमती शिंदे या व इतर महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात धनराज बिरादार यांनी योग मार्गदर्शन केले. त्याचबरोब प्राणायामाचे स्वरूप व महत्त्व यावर डा.नरेंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले. महादेव मंदिर डॅम रोड येथील कार्यक्रमात सौ भारती सुधीर भोसले व सौ अर्चनाताई चिकटवार यांनी महिलांच्यासाठी योग शिबिर घेतले. राम मंदिंंर जळकोट रोड येथे श्रीमति शंकुतला आदेप्पा,सौ कबाडे बाई,सौ चौधरी बाई,पाटील बाई,सौ आशा पंडित तसेच गणेश मंदिर समता नगर येथील महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला उपस्थित होत्या.सौ कलावतीताई भातंबरे यांनी योगाबद्दल मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत सुनीता गिरी यांनी आपले मत मांडले. काळा मारुती मंदिर येथील कार्यक्रमास सौ मधुमती शिंदे यांनी योगा बद्दल मार्गदर्शन केले, त्याचबरोबर सौ छायाताई बागबंदे यांचीही उपस्थित होती. संगीता मोतीपोवळे सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने संगीता मोतीपवळे यांनी ग्रंथ प्रदर्शन, महिला विषयक आरोग्य विषयावर मार्गदर्शन, महिलांचे कायदेविषयक हक्क, अधिकार, कर्तव्य यावर मार्गदर्शन तसेच योग व प्राणायाम यावर योग शिक्षिका मीनाक्षीताई स्वामी यांनी मार्गदर्शन केले. अनिता येलमटे यांचाही सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जगदेवी पोस्त्ते, पार्वतीबाई स्वामी, पाटीलताई आदींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. माधुरी जाधव, अड. रुक्मिणी सोनकांबळे यांनी उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले.