हिप्पळगाव येथे आजपासून व्हॉलीबॉलच्या खुल्या स्पर्धांचे आयोजन

हिप्पळगाव येथे आजपासून व्हॉलीबॉलच्या खुल्या स्पर्धांचे आयोजन

औराद बाऱ्हाळी (प्रतिनिधी) : कमलनगर तालुक्यातील हिप्पळगाव येथे स्व. व्यंकटराव रा. पाटील (गुरुजी) यांच्या स्मृतीप्रित्यार्थ व्हॉलीबॉलच्या खुल्या व औराद (बा) व कमलनगर तालुक्यासाठी स्वतंत्र दोन गटांत स्पर्धांचे शुक्रवार पासून आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा औराद व कमलनगर तालुक्यातील खेळाडूंसाठी व तालुक्या बाहेरील अशा दोन गटात स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेता संघास प्रथम पारितोषिक एकता फौंडेशनचे रविंद्र स्वामी यांच्या वतीने ३१ हजार रोख, दिपक पाटील यांच्या कडून व्दितीय पुरस्कार २१ हजार, बापू अंगद शिंगाडे यांच्या तर्फे तृतीय पुरस्कार १५ हजार, विनय व रुद्रा मुरहारी बिरादार यांच्या वतीने चतुर्थ पुरस्कार ११ हजार रोख रक्कम देण्यात येणार आहे. दोन्ही तालुक्यातील विजेता संघासाठी प्रथम पुरस्कार कोरेकल ग्रा. पं. अध्यक्ष धनराज बावगे तर्फे ७ हजार, उपाध्यक्ष सुभाष म्हेत्रे यांच्या वतीने ५ हजार व सदस्य ज्ञानेश्वर होळगे यांच्या कडून ३ हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धा संजीव पाटील, मंजुनाथ डोणगापूरे, अरविंद म्हेत्रे, मारोती कांबळे, श्रीकांत हुंडेकर आदींच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहेत.

About The Author

error: Content is protected !!