देवणी फुलेनगर सार्वजनिक वाचनालयात जागतिक महिला दिन साजरा

देवणी फुलेनगर सार्वजनिक वाचनालयात जागतिक महिला दिन साजरा

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी शहरात महात्मा फुले नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ.सखुबाई दशरत राणे व या वाचनालयाच्या अध्यक्ष सौ.रेखाताई डोंगरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रातिज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष रेखाताई डोंगरे म्हणाल्या की, शिक्षण हे वाघीणीच दूध आहे, जो कोणी पेईल तो निश्चितच गुरगुरणार. शिका, संगठीत व्हा, आणि संघर्ष करा.यावेळी अध्यक्ष रेखाताई डोंगरे, सखुबाई दशरत राणे, कविता वैजनाथ जाधव, पार्वती संतोष सुर्यवंशी, जयश्री अजय सुर्यवंशी, रुक्मिणी रावण सूर्यवंशी, ग्रंथालय संघ तालुका उपाध्यक्ष कृष्णा पिंजरे, रवी डोंगरे, वाचनालय सचिव डोंगरे नीलकंठ उपस्थिती होते.

About The Author

error: Content is protected !!