बोरोळ येथील पालकांचे गटविकास अधिका-यांना निवेदन
देवणी (प्रतिनिधी) : मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे शालेय स्तरावर घ्यावयाची इसरो सहल निवड परीक्षा आयोजित न करता दहा पैकी फक्त दोन विद्यार्थ्यांची निवड केल्या बदल बोरोळ येथील पालकांने गटविकास अधिका-यांना कार्यवाही करण्याचे निवेदन देण्यात आले. शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद लातूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शैक्षणिक सहल निवड प्रक्रियेची शालेय स्तरावरील परीक्षा जिल्हा परिषद प्रशाला बोरोळ येथे न घेताच आणि विद्यार्थ्यांना कोणतीही कल्पना न देता, परस्पर चर्चां करून दहा पैकी दोन विद्यार्थ्यांची निवड करून केंद्र स्तरावर पाठविण्याची प्रक्रिया येथील शिक्षकांनी केलेली आहे. बाकी आठ विद्यार्थ्यांचे झालेले नुकसानीला जबाबदार येथील मुख्याध्यापक आणि शिक्षक आहेत. या बेजबाबदार शिक्षकांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन गटविकास अधिका-यांना देण्यात आले. या निवेदनावर निवृत्ती सुर्यवंशी, सत्यदेव गरड, दत्ता हुरुचनाळे आणि शालेय समितीचे सदस्य युवराज देवणे अदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.