स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थेतील महिलांचा समारंभ संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय-हिंद पब्लिक स्कूल आणि जु.कॉलेज,स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, स्वामी विवेकानंद फार्मसी महाविद्यालय, स्वामी विवेकानंद नर्सिंग महाविद्यालय,स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या विविध शाळा,महाविद्यालयात कार्यरत 106 महिला शिक्षक तथा शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्याचा भव्य सत्कार समारंभ कार्यक्रम स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील फिजिक्स विभागाचे प्राध्यापक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या फिजिक्स विषयाचे अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. मल्लेश झुंगा स्वामी,संगणकशास्त्र विषयातील अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. सदानंद अवाळे, सामाजिक कार्यकर्त्या तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीमती उत्तराताई कलबुर्गे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. माधवी जाधव, शिक्षिका-कवियत्री प्रीती दुर्गरकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष दीपाली औटे,लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथील शिक्षिका-सामाजिक कार्यकर्त्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नीता मोरे उपस्थित होत्या. तर जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय हट्टे, उपप्राचार्या मनीषा कंगळे, स्कूल मॅनेजर ज्योती स्वामी,स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. धनंजय गोंड, शैक्षणिक संचालक डॉ. उमाकांत पाटील, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. एस. एन. जाधव,राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी तथा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कार्यकर्माधिकारी पुरस्कार प्राप्त प्रा. अमर तांदळे,प्रभारी प्राचार्य दिग्विजय केंद्रे, जय हिंद ज्यु.कॉलेजचे प्रभारी अतेंद्र सिंग,सतीश वाघमारे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी नूच्चे, फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी अंबिका झरकुंटे,नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी अश्विनी राऊत, जय हिंद स्कूलच्या विद्यार्थी प्रतिनिधी गौतमी खोकले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणेच्या हस्ते राष्ट्रमाता माँ जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच संस्थेमध्ये विविध पदावर कार्यरत 106 महिलांचा भव्य सत्कार प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपस्थित महिलाना संबोधित करतांना डॉ. माधवी जाधव म्हणाल्या की, आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत.पुरुषाच्या खाद्याला खांदा लावत देशाला जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने पुढाकार घेत आहेत. ही फार आनंदाची बाब आहे. पण आजच्या या स्पर्धेच्या युगात महिलांनी स्व कडे पण लक्ष देणे गरजेचे आहे.त्यांनी वेळो वेळी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली पाहिजे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्याचे स्वैराचारात बदल न होऊ देता आपणच आपल्यावर काही बंधने घालून स्वतःला जपले पाहिजे. असे ही त्या म्हणाल्या.तर प्रीती दुर्गरकर यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या विविध प्रश्नांवर भाष्य केले. त्यांनी चाळीशी नंतर महिलांच्या समोर कोण कोणते प्रश्न उपस्थित राहतात? हे कवितेच्या माध्यमातून मांडले. दीपाली औटे यांनी आपल्या मनोगतात महिला सक्षमीकरण बाबत विचार मांडताना, प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे जात आहे. तिच्या समोर अनेक अडचणी आहेत तरी देखील ती न डगमगता त्यातून मार्ग काढत पुढे जात आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, मनोरंजन प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी नीता मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की,आज महिला पूर्णपणे स्वतंत्र आहेत. आपला निर्णय घेण्यासाठी त्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचंय आहे, त्या आपल्या आवडी निवडी प्रमाणे करू शकतात. योग्य वेळ आणि संधी चा उपयोग महिलांनी आपल्या जीवनात करून घेतला पाहिजे. महिलांनी स्वतंत्ररित्या मनमोकळेपणाने व्यक्त झालं पाहिजे. भारतीय संविधानाने सर्वांसाठीच मूलभूत अधिकार दिले आहेत. त्या अधिकाराचा व्यावहारिक जीवन जगत असतांना वापर करून यशाची शिखरे गाठली पाहिजेत, असे त्या म्हणाल्या. सदरील सत्कार समारंभात डॉ. उमाकांत पाटील, डॉ.धनंजय गोंड,मनीषा कंगळे, मनोरमा शास्त्री, ज्योती स्वामी, डॉ. एस. एन. जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. धनंजय गोंड यांनी केले . तर सूत्रसंचालन पत्रकारिता व माध्यमशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांनी केले. आभार प्राचार्य संजय हट्टे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नयन भालेराव, प्रा.ऋतुजा दिग्रसकर,प्रा. सोनल सोनफुले, प्रा. आकाश कांबळे, प्रा. राशिद दायमी, वैष्णवी चित्ते, वैष्णवी गुंडरे, संध्या लोहकरे,बिरादार सविता, वंगवाड भाग्यश्री, कविता भांगे, कल्याणी कदम, सोमवंशी उषा, सुशांत जाधव, झेरीकुंटे सोमनाथ, विजय सपाटे,अंकिता तोटरे, स्नेहा लांडगे, बेग झेबा, ज्योती पांडे,असिफ दायमी, महेश हुलसुरे,सादिक यांनी परिश्रम घेतले.