सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता.अहमदपूर येथे दि. २८/०२/२०२३ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष संचालक कुलदीप हाके पाटील प्रमुख उपस्थिती संचालिका सौ. शिवालिका कुलदीप हाके पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांची वेशभूषा परिधान करून न्युटनच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर नाटक सादर केले. तसेच काही विद्यार्थांनी विज्ञान या विषयावर व डॉ. सी. व्ही. रामान यांच्या जीवन कार्यावरति भाषण केले. या कार्यक्रमामध्ये शाळेच्या संचालक कुलदीप हाके यांनी विज्ञान दिनावरती सविस्तर असे मार्गदर्शन केले. व विज्ञान विषयाचे शिक्षक प्रा. संभाजी सांगळे यांचा सत्कार संचालक श्री. कुलदीप हाके यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक आल्यामुळे रूतिक पोले यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रात्साविक व संचालन विज्ञान विषयाचे शिक्षक प्रा.संभाजी सांगळे यांनी केले.तसेच प्रा. ऋतिक पोले यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्या रूथ चक्रनारायण व शाळेतील शिक्षक प्रा.भरत कानवटे, प्रा.शेख मोसिन, प्रा.शुभांगी सूर्यवंशी, प्रा.हीना कल्लुरकर, प्रा.ज्योत्सना स्वामी, प्रा. स्नेहा ओझा, प्रा.अंजली बोधनकर, प्रा.आयुषी पोले व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.