संत ज्ञानेश्वर विद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न महिलांनी महिलांचा सन्मान करावा – प्राचार्या रेखाताई तरडे-हाके

संत ज्ञानेश्वर विद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न महिलांनी महिलांचा सन्मान करावा - प्राचार्या रेखाताई तरडे-हाके

अहमदपूर (गोविंद काळे) : एक स्त्री कुटुंबामध्ये अनेक भूमिका बजावत असते. त्यामध्ये मुलगी, बहीण,पत्नी, आई,काकी,मावशी, आजी म्हणून भूमिका साकारताना नात्यांमध्ये एकमेकांना सन्मान दिला पाहिजे. स्त्रीच स्त्रीचा शत्रू असते पण मैत्रीण बनली पाहिजे असे मत प्राचार्या रेखाताई तरडे-हाके यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त बोलताना व्यक्त केले.

यावेळी प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे-हाके तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख नंदकुमार कोनाले, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे,मुख्याध्यापक उद्धव शृंगारे, संघमित्रा तिगोटे सह माता पालक उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त संस्थासचिव प्राचार्या रेखाताई तरडे व शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांच्या हस्ते सर्व शाळेतील महिला शिक्षकांचा लेखनी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पहिली ते दहावी वर्गातील मुलींनी महान महिलांच्या वेशभूषेत येऊन त्यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका मीना तोवर यांनी केले. सूत्रसंचालन माही सांगुळे व आदिती होळंबे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी मानले. शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About The Author