तुकारामांच्या अभंगातून जीवनातील सर्व प्रश्नांचे उत्तर मिळते – ह. भ. प. प्रो.डॉ. अनिल मुंढे महाराज

तुकारामांच्या अभंगातून जीवनातील सर्व प्रश्नांचे उत्तर मिळते - ह. भ. प. प्रो.डॉ. अनिल मुंढे महाराज

अहमदपूर (गोविंद काळे) : ‘आम्ही जातो अमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा’ या निरोपासमयीच्या निरूपणात्मक अभंगांचे अभ्यासपूर्ण विवेचन केल्यानंतर ‘संतश्रेष्ठ जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून चराचरातल्या जीवधारींनी कसे जगावे? कसे जगावे? संकटातून मार्ग कसा काढावा ? आदिची शिकवण दिली असून त्यांच्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून जीवनातील सर्व प्रश्नांचे समर्पक उत्तर मिळते असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागातील ह. भ. प. प्रो. डॉ. अनिल मुंढे महाराज यांनी केले .

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ते महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संत तुकाराम महाराज बीज या कार्यक्रमानिमित्त बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, पुढे बोलतांना महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रवचनकार ह.भ.प. प्रो. डॉ. अनिल मुंढे महाराज म्हणाले की, तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनात प्रचंड संघर्ष केला सनातनी आणि मनू प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांचा वारंवार छळ होत राहिला. परंतु त्यांनी विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ विचारांच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य शेवटपर्यंत केले. श्री संत तुकाराम महाराज यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी आणि स्वराज्याच्या विस्तारासाठी मोलाचे सहकार्य केले.मुगल कालीन राजवट उलथून टाकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती आणि त्या शक्तीला संत तुकाराम महाराजांच्या भक्तीचा संयोग घडून आला, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य प्रो. डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. सतीश ससाणे, डॉ.डी.एन.माने, डॉ. मारोती कसाब, डॉ. संतोष पाटील, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author