सूर्यकांत पवार यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर जिल्हा लातूर येथील मानणीय जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग 1 न्या. व्हि. व्हि. गायकवाड साहेब यांनी दिनांक 6/3/2023 रोजी सूर्यकांत सुखदेव पवार राहणार आंबेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर याची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे या प्रकरणात आरोपीची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ अॅड टी एन कांबळे यांनी मांडली तर त्याना त्यांचे ज्युनिअर अॅड पी यु येरे यांनी मदत केली. फिर्यादीने दिलेली थोडक्यात फिर्याद अशी की, दिनांक22/12/2020 रोजी फिर्यादी श्रीमती काशीबाई पांडुरंग माने राहणार आंबेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर हिने पोलीस स्टेशन अहमदपूर येथे हजर होऊन खबर दिली की दिनांक 21 .12 .2020 रोजी मी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करून माझ्या घराचे फायबरच्या दरवाजाला दोरी बांधून मी बाजेवर झोपी गेले होते दिनांक 22 12 2020 रोजी रात्री अंदाजे साडेबारा वाजण्याच्या सुमारास आमच्या गावातील सूर्यकांत सुखदेव पवार राहणार आंबेगाव जात मातंग हा माझ्या घराचा दरवाजा तोडून दरवाज्याची दोरी सोडून घरात आला व माझ्या तोंडावर घरातील दोरीवर टाकलेली साडी घेऊन ती साडी माझ्या तोंडावर दाबून धरला त्यावेळी मी चिरकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला तू चिरकलीस का चिरकली तर तुला फाशी देतो नाहीतर डोक्यात दगड घालतो असे म्हणाला तेव्हा मी त्यास तू माझ्या घराकडे कधीच येत नाहीस तू घराकडे कशाला आलास असे म्हणाले असता मी तुझ्याकडे आलाव असे म्हणाला व माझ्या डोक्याचे केस धरून माझ्यासोबत झोंबा झोंबी करू लागला तेव्हा मी आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याच्या दोन्हीही हाताचे बोटं माझ्या तोंडात घालून माझे गाल फाकवू लागला त्यानंतर तो माझ्या अंगावर पडून माझे मुके घेऊ लागला तेव्हा मी त्यास विरोध केला असता त्याने माझे डाव्या गालाचा जोराने चावा घेतला तेव्हा मला मरण यातना झाल्या मी बाजेवर शांत झोपले असता त्याने माझे छाती दाबून माझे परकल व साडीवर करून माझ्यासोबत त्याने तीन वेळा बळजबरीने इज्जत घेतली संभोग केला व पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तो निघून जातेवेळी तू कोणाला सांगितलीस तर तुला खतम करून टाकतो असे धमकी देऊन गेला त्यानंतर माझे गालाला जोराने चावल्यामुळे माझा गाल दुखत होता मला जागचे उठण्यासाठी आवसान नव्हते मला उठता येत नसल्याने मी सकाळ होईपर्यंत बाजेवर तसेच झोपून राहिले सकाळी सहा वाजता मी उठून आरशात पाहिले असता माझा डावा गाल खूप सुजला होता व माझ्या नाकातील खडा व माझ्या गळ्यातील एक ग्रामचे मनी दिसले नाहीत त्यानंतर मी गावात जाऊन भागवत जगताप, बिभीषण पाटील जगताप यांच्या घरी जाऊन माझे सोबत घडलेली घटना त्यांना सांगितली असता त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दे असे सांगितले त्यानंतर मी माझा चुलत भाऊ गणेश बाबुराव माने यांच्या घरी जाऊन त्यांना व माझे चुलत भाऊजय कमल न्यानोबा माने यांना माझ्यासोबत घडलेली घटना सांगितली तेव्हा गणेश माने यांनी माझा लातूर येथे राहणारा भाऊ उद्धव माने व भावजय शालु माने यांना मोबाईल फोन करून मला बोलण्यासाठी दिला असता मी त्यांना सदरची घटना फोनवरून सांगितले त्यानंतर मी व माझा चुलत भाऊ गणेश माने असे दोघेजण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देत आहे तरी दिनांक 22 12 2020 रोजी साडेबारा ते चार वाजण्याच्या सुमारास आमच्या गावातील सूर्यकांत सुखदास पवार अंदाजे वय 25 वर्षे राहणार आंबेगाव माझ्या घरात येऊन माझ्यासोबत झोंबा झोंबी करून माझ्या डाव्या गालाला जोराचा चावा घेऊन तीन वेळा बळजबरीने इज्जत घेऊन संभोग केला जातेवेळी मला जीवे मारण्याची धमकी दिली.
आशा स्वरूपाचा आरोप करून फिर्यादीने सूर्यकांत पवार याच्या विरोधात अहमदपूर पोलीस स्टेशन येथे दिले होते त्याप्रमाणे अहमदपूर पोलीस ने गु र नं 404/2020 कलम 376,376(2),506 भा द वी प्रमाणे गुन्हा नोंद करून, आरोपीला अटक केली व आरोपीच्या विरुद्ध दोषारोप पत्र सादर केले त्यानंतर सदर प्रकरण जिल्हा न्यायाधीश साहेबाकडे सेशन केस नंबर 9/2021अन्वे कमिट करण्यातआले सदर प्रकरण साक्षी पुरवायला आल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीने एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले होते. सरकार पक्षाचा पुरावा संपल्यानंतर दोन्ही वकिलांचे युक्तिवाद मेहेरबान कोर्टाने ऐकला त्यामध्ये आरोपीचे वकिल एडवोकेट टी एन कांबळे व त्यांचे ज्युनिअर एडवोकेट पी यु येरे यांनी आपली बाजू मांडली त्यामध्ये अडवोकेट कांबळे यांनी असा युक्तिवाद केला की सदर केस मध्ये आरोपीला राजकीय व्देषातून गोवण्यात आले असून यामध्ये फिर्यादीच्या बयान व मेडिकल इव्हिडन्स यामध्ये तफावत आहे व सदर प्रकरणात इतर साक्षीदाराचे सुद्धा साक्षी यांच्यामध्येही तफावत आढळून येत आहे सरकार पक्षाच्या वतीने हे प्रकरण सबळ पुराव्याने सिद्ध केलेले नाही आरोपीने अशा प्रकारचा कसलाही गुन्हा केला नाही हे सविस्तर युक्तिवाद आरोपीच्या वतीने मेहेरबान कोर्टामध्ये करून आरोपी निर्दोष असल्याचे मेहेरबान कोर्टाला पटवून दिल्यानंतर मेहरबान कोर्टाने अॅड कांबळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुनआरोपीला निर्दोष सोडून दिले व त्याला या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले या प्रकरणाकडे या विभागाचे लक्ष लागून राहिले होते.