विद्यावर्धिनी हायस्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा

विद्यावर्धिनी हायस्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा

उदगीर(एल.पी.उगीले) : येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित विद्यावर्धिनी हायस्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिनानिमित्य मुख्याध्यापक बी.बी नागरवाड यांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या समयी नागरवाड म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जीवनभर संघर्ष करून शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला, म्हणूनच आज देशामध्ये सर्व क्षेत्रात मुली अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम ढगे यांनी केले, सुत्रसंचालन एम.एस जाधव यांनी तर आभार के. एम राजूरकर यांनी मानले. यावेळी पर्यवेक्षक व्ही.एम बांगे, कार्यालय प्रमुख डी.पी सूर्यवंशी, परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील, बंडू पाटील, कलाशिक्षक एन.आर जवळे, इंद्रजीत कांबळे, विपुल बोरोळे, क्रांती पाटील,गफूर कोतवाल, मोहन विभुते,ओम राजुरकर सह विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणप्रेमी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

About The Author